शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता महिलेचा मृतदेह ३८ तासानंतर सापडला; रांजणखळगेच्या कुंडात घसरला होता पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 16:56 IST

टाकळी हाजी कुंडावर हात पाय धुण्यासाठी गेलेली महिला शेवाळ खडकावरून पाय घसरून कुंडात वाहून गेली होती

टाकळी हाजी : रांजणखळगे परिसरातील कुंडातील खडकावर पाय धुण्यासाठी गेलेल्या वाशिम जिल्ह्यातील पदमाबाई शेषराव काकडे वय वर्षे ५५ या महिलेचा मृतदेह ३८ तासानंतर कुंडापासून सहाशे मिटर अंतरावर असलेल्या ठाकर वस्तीजवळील नदीत गुरुवार दिनांक १० रोजी सकाळी सात वाजता सापडला. 

दुपारी शवविच्छेदन झाल्यावर सायंकाळी रांजणगाव ता. शिरुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ही महिला वाशिम येथून रांजणगाव एम आय डी सी मध्ये कामाला असलेल्या जाव‌ई महेंद्र शहादेव औताडे यांच्याकडे आली होती. त्यानंतर औताडे यांचे कुटुंबीय देवी दर्शनासाठी टाकळी हाजी कुंडावर आले होते. हात पाय धुण्यासाठी ही महिला खडकाजवळ गेली. शेवाळ खडकावरून पाय घसरून तोल सावरता न आल्याने कुंडात वाहून गेली. जाव‌ई महेंद्र औताडे यांनी प्रयत्न करुनही सासुला वाचवण्यास त्यांना अपयश आले. काकडे व औताडे कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने कुंडावर आले होते. 

हेडकॉन्स्टेबल डहाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ३८ तास शोधमोहीम राबवून मृतदेह सापडण्यासाठी परिश्रम घेतले. पाटबंधारे विभागाचे निघोज शाखाधिकारी पाटील यांनी कुंडाचे पाणी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. पारनेर तालुका पत्रकार संघाचे निघोज शहाराध्यक्ष योगेश खाडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते नानापाटील वराळ व ग्रामस्थांनी पोलीसांना सहकार्य केले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीDeathमृत्यूPoliceपोलिसShirurशिरुर