अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर भावासह दोघांनी केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 14:31 IST2023-12-21T14:30:41+5:302023-12-21T14:31:33+5:30

मुंढवा येथील एका अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिच्या भावासह दोघांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

minor deaf girl was molested by two people along with her brother shocking incident in Pune | अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर भावासह दोघांनी केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर भावासह दोघांनी केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : शहरात दररोज महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनामुळे संताप व्यक्त होत असतानाच, त्यांच्या जवळचे लोक, नातेवाईक, मित्र परिवार यांच्याकडून अत्याचार होत असल्याने महिला-मुली नेमक्या कुठे सुरक्षित आहेत असा सवाल देखील उपस्थित होत आहे. मुंढवा येथील एका अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिच्या भावासह दोघांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

१७ वर्षीय पीडितेने तिच्या शिक्षिकेजवळ घटलेला प्रकार सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तसेच २०१८ पासून या पीडितेवर अशाप्रकारे अत्याचार सुरू होता असे देखील फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कर्णबधीर शाळेच्या एका ५१ वर्षीय महिला शिक्षिकेने मुंढवा पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. यावरून सागर रजाने (३०, रा. उंड्री, कोंढवा), राहुल पाटील (२३) यांच्यासह तिच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर (पीडितेचा भाऊ) पोक्सो अॅक्ट सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १७ वर्षाची आहे. आरोपी सागर याने पीडित मुलगी राहत असलेल्या घरी येऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिला माराहण करुन याबाबत कोणाला सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या अल्पवयीन भावाने ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.

तसेच पीडित मुलीचा मित्र राहुल पाटील याने तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार शाळेतील शिक्षिकेला सांगितला. त्यानंतर शिक्षिकेने मुंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत तिघांविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले या करत आहेत.

Web Title: minor deaf girl was molested by two people along with her brother shocking incident in Pune