‘असेही’ रंगते पुण्यात अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचे नाट्य... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:12 PM2018-10-15T21:12:39+5:302018-10-15T21:44:41+5:30

भरदिवसा रस्त्यावर एका मुलाचे अपहरण होत असल्याचा प्रकार महिला पोलिसाने कळविल्याने पोलीस यंत्रणा जास्त कार्यक्षमतेने सतर्क होते़.

The minor boy's kidnapping drama in pune | ‘असेही’ रंगते पुण्यात अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचे नाट्य... 

‘असेही’ रंगते पुण्यात अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचे नाट्य... 

Next

पुणे : वेळ सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारासची़ स्थळ नवले पुलाजवऴ़़ एक जीप उभी असते़. त्यात तीन ते चार जण एका अल्पवयीन मुलाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीपमध्ये बळजबरीने बसायला लावत असतात. ही बाब कामावर जाणारी एक महिला कॉन्स्टेबल पोलीस पाहते़. ती तातडीने या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन देते़. 
भरदिवसा रस्त्यावर एका मुलाचे अपहरण होत असल्याचा प्रकार महिला पोलिसाने कळविल्याने पोलीस यंत्रणा जास्त कार्यक्षमतेने सतर्क होते़. तोपर्यंत ती जीप तेथून निघालेली असते़. मार्शल त्यात जीपचा पाठलाग करु लागतात़. काही अंतरावर जीपला थांबविले जाते़. जीपमध्ये एक अल्पवयीन मुलगा असतो़. त्यामुळे पोलीस मार्शललाही तो अपहरणाचा प्रकार वाटतो़. जीपमधील लोक आम्ही पोलीस असल्याचे सांगत असतात़. पण मार्शल त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतात़. पाठोपाठ पोलीस अधिकारी तेथे पोहचतात़.. सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात येते़. तेथे त्यांची चौकशी सुरु होते़. तेव्हा ते खरेच पोलीस असल्याचे निष्पन्न होत या अपहरण नाट्यावर पडदा पडतो़. 
नवले पुलावर सोमवारी सकाळी हा प्रकार घडला होता़. याबाबतची माहिती अशी, कराड येथील एका खुन प्रकरणात एक अल्पवयीन मुलाला तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले होते़. त्याला येरवडा येथील सुधारगृहात ठेवण्यात आले होते़ .तेथून तो पळून गेला होता़. हा मुलगा नवले पुलाजवळील आपल्या घरी येणार असल्याची माहिती कराड पोलिसांना मिळाली होती़. त्यानुसार त्यांनी नवले पुलाजवळ सापळा रचला होता़. त्या मुलाला पोलीस ताब्यात घेतात़. पण तो जीपमध्ये बसायला तयार नव्हता़. त्यामुळे त्यांच्यातील एक जण त्याला आपण पोलीस असल्याचे सांगून पिस्तुल दाखवतो़. नेमके त्याच वेळी तेथून एक महिला पोलीस कॉन्स्टेबल जात असते़. ती तो प्रकार हाते़ तिला तो अपहरणाचा प्रकार वाटतो व ती पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती देते़. 
या प्रकाराची माहिती मिळताच सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संगीता यादव व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचतात़ ते पोलीस असल्याची खात्री पटल्यावर त्यांना सोडून दिले जाते़. 

Web Title: The minor boy's kidnapping drama in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.