Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 09:37 IST2025-10-04T09:32:37+5:302025-10-04T09:37:44+5:30
Gautami Patil Car Accident: मंगळवारी पहाटे ५ वाजता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात हा अपघात घडला. या अपघातातील जखमी रिक्षाचालक याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
पुणे - शहरातील रिक्षा अपघात प्रकरणात लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) अडचणीत सापडली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विषयात डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत गौतमी पाटीलला उचलायचं की नाही अशी विचारणा केली. वडगाव बुद्रुक परिसरात भरधाव वेगाने आलेल्या कारने रिक्षाला धडक दिली. या अपघातातील वाहन गौतमी पाटील हिच्या नावावर आहे. त्यात रिक्षाचालक सामाजी मरगळे जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपघात प्रकरणी गौतमी पाटील हिला नोटीसही बजावली आहे. त्यात अपघातातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत.
धडक देणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी पहाटे ५ वाजता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात हा अपघात घडला. या अपघातातील जखमी रिक्षाचालक याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास होत नाही असा आरोप जखमी रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केला. या नातेवाईकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीत चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन करून प्रकरणाची माहिती घेतली. या वाहनात गौतमी पाटील होती की नव्हती, संबंधित चालकाला अटक करा, वाहन जप्त करा असं चंद्रकांत पाटलांनी पोलिसांना सांगितले. त्याशिवाय रिक्षाचालकाच्या उपचाराचा खर्च गौतमीला करायला लावा असंही पाटील यांनी म्हटलं.
फोनवर काय बोलणं झाले?
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डीसीपींना फोन केला, त्यावर ते म्हणाले की, गौतमी पाटीलला उचलायचं की नाही...गाडी ज्याची आहे त्यांच्यावर कारवाई करायची नाही का..गौतमी पाटील कारमध्ये नव्हती मग कार कोण चालवत होते, जो कुणी कार चालवत होतं त्याला पकडायला हवे ना...यावर डीसीपींकडून वाहन चालकाला अटक केल्याची माहिती देण्यात आली. यावर चंद्रकांत पाटलांनी पकडले, गुन्हा दाखल करा, वाहन कुठे आहे ते जप्त करा आणि मालकीन असेल तिला नोटीस द्या. रिक्षाचालकाची मुलगी माझ्यासमोर बसलीय, जखमीचा खर्च करायला सांगा अशा सूचना चंद्रकांत पाटलांनी पोलिसांना दिल्या.
पाहा व्हिडिओ