मिनी बसला आग अन् दरवाजा झाला लॉक; पुण्यातील घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू, सहा जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 06:55 IST2025-03-20T06:55:13+5:302025-03-20T06:55:38+5:30

बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. व्योम ग्राफिक्स कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन मिनी बस पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे येत होती. 

Mini bus catches fire and door gets locked; Four die, six injured in Pune incident | मिनी बसला आग अन् दरवाजा झाला लॉक; पुण्यातील घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू, सहा जखमी 

मिनी बसला आग अन् दरवाजा झाला लॉक; पुण्यातील घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू, सहा जखमी 

हिंजवडी (जि. पुणे) : हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या ‘आयटी’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला अचानक आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले. मागील दरवाजा उघडला न गेल्याने अडकून पडलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. व्योम ग्राफिक्स कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन मिनी बस पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे येत होती. 

कंपनीपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर...    
कंपनीपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असतानाच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग लागल्याचे लक्षात येताच बस दुभाजकाच्या बाजूला उभी करून, चालक आणि समोर बसलेले कर्मचारी तातडीने बसमधून बाहेर पडले. परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.  

मृतांची नावे : सुभाष भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (५८, रा. नऱ्हे), गुरुदास लोकरे (४०, रा. हनुमाननगर, कोथरूड) आणि राजू चव्हाण (४०, वडगाव धायरी)  

 

Web Title: Mini bus catches fire and door gets locked; Four die, six injured in Pune incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.