शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 6:10 PM

पुणे-नगर महामार्गालगत असणार्‍या गणेश हार्डवेअर या दुकानाला भीषण आग लागून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देप्लाय, प्लॅस्टिक पाईप, वायर व अन्य वस्तुमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरत गेली.आग लागल्याचे वेळेत कळाले नसते तर त्याची झळ अन्य दुकानांनाही बसली असती. आग लागल्यानंतर लोणीकंद पोलीसही सुरक्षेखातर घटनास्थळी दाखल झाले होते. 

वाघोली : पुणे-नगर महामार्गालगत असणार्‍या गणेश हार्डवेअर या दुकानाला भीषण आग लागून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास घडली. ग्रामस्थ व अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने शेजारील इतर दुकानांची हानी टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर माहामार्गालगत शिवाजी पुतळा चौकाजवळ तांबे यांचे गणेश हार्डवेअर आणि सप्लायर्स नावाचे दुकान आहे. रात्री साडे बाराच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजूने आग लागल्याचे बाजूच्या इमारतीत राहणार्‍या नागरिकांच्या लक्षात आले. आग मोठ्या स्वरूपात असल्याने दुकानाच्या वरील दहा ते बारा नागरिकांना सुरक्षित हलवून पाण्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न दुकान मालक व ग्रामस्थांनी केला. आगीचे प्रमाणे मोठे असल्याने आग आटोक्यात येणे शक्य झाले नाही. यानंतर अग्निशामक दलाला बोलाविण्यात आले. अग्निशामक दलाने काही वेळेतच आग विझविली. प्लाय, प्लॅस्टिक पाईप, वायर व अन्य वस्तुमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरत गेली. दुकानाचा पुढील काही भाग वगळता आतील सर्व माल जळून खाक झाला. दुकानाशेजारी प्लॅस्टिक वस्तुंचे, मेडिकल व कपडयाचे दुकान आहे. आग लागल्याचे वेळेत कळाले नसते तर त्याची झळ अन्य दुकानांनाही बसली असती. आगीचे स्वरूप मोठे आणि जिन्याच्या शेजारीच दुकान असल्याने दुकानाच्यावर राहणार्‍या  नागरिकांना खाली उतरविणे शक्य नव्हते. दुकान मालक व भाडेकरूंचा यामध्ये सहभाग होता. काही जणांना इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून खाली उतरविण्यात आले तर एक महिला मुलाला सोबत घेवून खाली उतरली. आग लागल्यानंतर लोणीकंद पोलीसही सुरक्षेखातर घटनास्थळी दाखल झाले होते. 

टॅग्स :fireआगPuneपुणेPoliceपोलिस