शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मिल कामगारांचा मुलगा तिसऱ्यांदा झाला मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 09:05 IST

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून यंदा पाटील यांनी एक लाख मतांनी विजय मिळविला आहे.

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पाटील यांचा जन्म मुंबईमध्ये सर्वसामान्य घरात झाला. त्यांचे आई-वडील मिल कामगार होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून पाटील यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली हाेती. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून यंदा पाटील यांनी एक लाख मतांनी विजय मिळविला आहे.सन २०१४ मधील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांनी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (सार्वजनिक उपक्रम वगळता) कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर महायुतीच्या शिंदे सरकारमध्ये पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी होती. आता फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांनी तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.चंद्रकांत पाटील यांनी सन २०१९ ते २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्याशिवाय कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी त्यांच्यावर होती. २००८ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून पाटील यांची निवड झाली. २०१४ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा त्यांची आमदार म्हणून निवड झाली. २०१९ आणि २०२४ साली कोथरूड, विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून पाटील यांची निवड झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे समर्पित कार्यकर्ता, महाराष्ट्र संघटन महामंत्री आणि राष्ट्रीय महासचिव पदांवर पाटील यांनी काम केले. १९९५-१९९९ या कालावधीत रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह पाटील यांनी काम केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीMaharashtraमहाराष्ट्र