दुधी भोपळा, काकडी, हिरवी मिरची, मटार महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:11 IST2021-01-25T04:11:43+5:302021-01-25T04:11:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्या इतकीच असली तरी केवळ मागणी वाढल्याने दुधी भोपळा, ...

Milk gourd, cucumber, green chillies, peas are expensive | दुधी भोपळा, काकडी, हिरवी मिरची, मटार महागले

दुधी भोपळा, काकडी, हिरवी मिरची, मटार महागले

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्या इतकीच असली तरी केवळ मागणी वाढल्याने दुधी भोपळा, काकडी, हिरवी मिरची आणि मटारच्या दरात १०-२० टक्क्यांनी वाढ झाली, तर शिमला मिरचीच्या दरात मात्र घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. २४) ८० ते ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून १० ते ११ टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक आणि राजस्थानातून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून मटार ११ ते १२ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरामधून ७ ते ८ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ३० ते ३५ ट्रक इतकी आवक झाली आहे.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १५०० ते १६०० गोणी, कोबी सुमारे ७ ते ८ टेम्पो, प्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, भुईमुग शेंगा ५० ते ५५ पोती, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, नवीन कांदा १४० ट्रक तर जुना कांदा ३० ट्रकइतकी आवक झाली.

--------

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा २२-२७ ३०-५०

बटाटा ०८-१६ २०-३५

टोमॅटो ०४-०६ १०-१५

भेंडी २५-३० ३०-४०

गवार ३५-४० ४०-५०

मिरची ३५-५५ ४५-६०

कोथींबीर ०७-१० १०-१५

मेथी ०७-०८ १०-१५

मटार २५-२६ ४०-५०

गाजर १५-१८ २०-२५

---

पालेभाज्या महागल्या

मार्केट यार्डात रविवारी कोथिंबीर, चाकवत, करडई, अंबाडी, राजगिरा, चुका, पालकच्या दरात चांगलीच वाढ झाली. तर शेपू, मुळे आणि चवळईच्या दरात घट झाली. मेथी, कांदापात, पुदीना, हरभरागड्डीचे भाव स्थिर होते.

रविवारी मार्केटयार्डात कोथींबीरीच्या १ लाख जुड्यांची मेथी ५० हजार जुड्यांची आणि हरभ-याची ३५ हजार गड्डींची आवक आवक झाली. कोथींबीरीची जुडीमागे ७ रुपये, चुका जुडीमागे ३ रुपये, चाकवत २ रुपये, अंबाडी, राजगिरा आणि पालक प्रत्येकी दोन रुपये आणि करडई जुडीमागे १ रुपयांनी वाढ झाली आहे़ तर मुळे आणि चवळई जुडीमागे ३ रुपयांनी, शेपू दोन रुपयांनी भाव उतरले आहेत. अन्य पालेभाज्यांचे भाव होते.

- अमोल घुले, व्यापारी

Web Title: Milk gourd, cucumber, green chillies, peas are expensive