शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मैलामिश्रित पाणी रस्त्यावर

By admin | Updated: August 21, 2015 02:30 IST

मांजरी बुद्रुक गोपाळपट्टी येथील मुख्य रस्त्यावर ड्रेनेजलाईनच्या एका चेंबरमधून मैलामिश्रित सांडपाणी काही दिवसांपासून दररोज मुख्य रस्त्यावर वाहत

मांजरी : मांजरी बुद्रुक गोपाळपट्टी येथील मुख्य रस्त्यावर ड्रेनेजलाईनच्या एका चेंबरमधून मैलामिश्रित सांडपाणी काही दिवसांपासून दररोज मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने या परिसरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील रहिवासी, दुकानदार व्यावसायिक, प्रवासी तसेच वाहनचालक यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.संबंधित ड्रेनेजलाईन करताना दरडी व गोपाळपट्टी या वस्तीतील अंतर्गत रस्ते व त्यांना जोडणारी पाईपलाईन अत्यंत अरुंद म्हणजे ८ ते १० इंच व्यासाची आहे. हे काम करताना अत्यावश्यक असणारा चढउतार शास्त्रोक्त पद्घतीने नियमित न केल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे, असे नागरिक सांगतात. याचाच अर्थ, भविष्यातील वाढत्या नागरीकरणाचा विचारही न करता निकृष्ट पद्धतीने काम केल्याने नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.हा रस्ता हडपसर, मांजरी, थेऊर, वाघोली या गावांकडे जाणारा असल्याने वाहनचालकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. याकडे डोळेझाक होत असल्याचा आरोप हडपसर विधानसभा शिवसेना विभागप्रमुख बाळासाहेब घुले यांनी केला.पाऊस अथवा महापालिकेतील संभाव्य समावेश, अशी कारणे असतील तर संबंधित काम जर नियोजनबद्घ पद्घतीने केले असते, तर पुन्हा नागरिकांच्या कररूपी पैशाचा अपव्यय टाळता आला असता. येत्या १५ दिवसांत ड्रेनेजलाईनच्या समस्येवर तातडीने व कायमस्वरूपी उपाययोजना करावी; अन्यथा तेच मैलामिश्रित सांडपाणी दररोज आपल्या कार्यालयात आणून ओतले जाईल, असे बाळासाहेब घुले यांनी लेखी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कळविले आहे. या ड्रेनेजलाईनमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा व दुधाच्या पिशव्या टाकतात. त्यामुळे पाणी पुढे जाण्यासाठी अडथळा ठरतो. हे पाणी चेंबरमधून बाहेर रस्त्यावर येत आहे. (वार्ताहर)