भुयारी मार्गामुळे मेट्रो ‘प्लॅन’ बदलणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:02 PM2019-03-30T23:02:23+5:302019-03-30T23:02:56+5:30

भुयार पाहण्यासाठी गर्दी : मेट्रो स्थानकाच्या कामामध्ये ठरू शकतो अडथळा

Metro plan to change under subway? | भुयारी मार्गामुळे मेट्रो ‘प्लॅन’ बदलणार ?

भुयारी मार्गामुळे मेट्रो ‘प्लॅन’ बदलणार ?

Next

लक्ष्मण मोरे / युगंधर ताजणे 
पुणे : महामेट्रोच्या वतीने स्वारगेट येथे विकसित करण्यात येत असलेल्या ‘मल्टी मोडल हब’च्या जागेमध्ये आढळून आलेल्या भुयारामुळे मूळ आरेखनामध्ये (प्लॅन) बदल करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भुयारांचे नेमके करायचे काय? असा प्रश्न मेट्रोच्या अधिकाऱ्यांपुढे आहे. स्थानकाच्या कामामध्ये या भुयाराचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वारगेट येथील अधिकाऱ्यांनी महामेट्रोकडून अभिप्राय मागविला आहे.

स्वारगेट येथे मल्टी मोडल हबच्या कामादरम्यान पायलिंग मशीनच्या साह्याने खड्डे घेत असतानाच राजर्षी शाहूमहाराज बस स्थानकालगतच्या बाजूची जमीन खचली. गोल खड्डा पडलेल्या जागेमधील माती बाजूला करून खाली उतरून पाहिले असता जमिनीखाली भुयार असल्याचे आढळून आले. बुधवारी दुपारी आढळून आलेल्या भुयाराची माहिती गुरुवारपर्यंत बाहेर आलेली नव्हती. याबाबत मेट्रोकडूनही वाच्यता करण्यात आलेली नव्हती. ही माहिती हाती लागताच ‘लोकमत’ने भुयार सापडल्याची सविस्तर
बातमी दिली. महामेट्रोने यासंदर्भात महापालिकेला पत्र दिले आहे. भुयारातील दगडी भिंतींचे बांधकाम नेमके कसे आहे आणि ते केव्हा करण्यात आले याबाबतची माहिती पालिकेकडे मागण्यात आली आहे. तब्बल ५५ मीटर लांब आणि दीड मीटर रुंद असलेले एक भुयार आहे. त्याला दक्षिण बाजूने आलेल्या पाईपची जोड आहे. काही जण हे ऐतिहासिक भुयार असल्याचे मत मांडत आहेत. तर काही जण स्वारगेट येथील जलतरण तलावासाठी या भुयाराद्वारे शेजारील कालव्यामधून पाणी आणण्यात आल्याचे सांगत आहेत. महापालिकेच्या भवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनाही याबाबत फारशी माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मेट्रोच्या पत्राला पालिका काय उत्तर देणार याविषयी उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाºयांनी आणि पालिकेच्या अधिकाºयांनी या भुयारांची पाहणी करणे आवश्यक असतानाही दोन्ही विभागाचे अधिकारी याठिकाणी फिरकलेच नसल्याचे मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळपासूनच याठिकाणी
पुणेकरांनी भुयार पाहण्यासाठी गर्दी केली होती. येथील अधिकाºयांनी संभाव्य गर्दी लक्षात
घेता जास्तीचे जॅकेट्स आणि हेल्मेट्स
आणून ठेवले होते. तरुणांपासून ते ६० वर्षीय आजीबार्इंमपर्यंत अनेकांना हे भुयार
पाहण्याची इच्छा होती. मात्र, छोट्याशा खड्ड्यामधून जवळपास १५ फूट खाली उतरावे लागत असल्याने मेट्रोच्या अधिकाºयांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना मनाई केली होती. मात्र, तरीही अनेकांनी केवळ खड्डा पाहूनच समाधान मानले.

भुयाराचे बांधकाम ऐतिहासिक वाटत नाही
मल्टी मोडल हबच्या कामादरम्यान स्वारगेटला आढळून आलेले भुयार इंग्रजीमधील ‘टी’ आकाराचे असून, ते दुसºया बाजूला बंद आहे. मात्र, हे बांधकाम ऐतिहासिक असेल असे वाटत नाही. भुयाराच्या भिंतीमध्ये स्टीलचा पाईप आढळून आला आहे. येथील जलतरण तलावाला कालव्यामधून पाणीपुरवठा करण्यासाठी ही व्यवस्था उभारली असावी असा अंदाज आहे. याबाबत महापालिकेला पत्र पाठविण्यात आले असून, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी करणे अपेक्षित आहे. - डॉ. हेमंत सोनवणे, प्रकल्प सरव्यवस्थापक

आॅर्किलॉजिकल सर्वेक्षण होणे गरजेचे; ‘लोकमत’मुळे भुयार कळले : वंदना चव्हाण
४सध्या शहरामध्ये अत्यंत गलथान पद्धतीने मेट्रोचे काम सुरू आहे. कोणत्याही प्रकारचे भौगोलिक सर्वेक्षण न करता हे काम सुरू आहे.
४आज ‘लोकमत’मध्ये आलेल्या भुयारी मार्गाच्या
बातमीमुळे आता मेट्रोने काम करण्यापूर्वी शहराचा आॅर्किलॉजिकल सर्वेक्षणदेखील करण्याची गरज
असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच ‘लोकमत’च्या वतीने देण्यात आलेल्या बातमीचे कौतुक करते, की त्यांच्यामुळे पुणेकरांना या पेशवेकालीन भुयारी मार्गाची माहिती मिळाली.

‘लोकमत’ने सर्वप्रथम ‘स्वारगेटला सापडले दोन भुयारी मार्ग’ ही बातमी ब्रेक केली आणि त्यानंतर शुक्रवारी दिवसभर पुण्यात या बातमीची चर्चा होती. सोशल मीडिया आणि पुणेकरांच्या तोंडात ‘भुयारी मार्ग सापडला!’ हेच शब्द होते. तसेच हा मार्ग पाहण्यासाठी नागरिकांनी स्वारगेटला मोठी गर्दी केली होती.

 


‘तो’ मार्ग पेशवेकालीन की ब्रिटिशकालीन?

पेशव्यांनी कात्रजवरून शनिवारवाड्यात पाणी आणले होते. कदाचित हा भुयारी मार्ग त्यापैकी एक असावा, मस्तानी तलावातील पाणी या भुयारी मार्गातून शनिवारवाड्यापर्यंत येत असावे, संकटकाळात शत्रूपासून बचाव करण्याकरिता भुयारी मार्ग बांधला असावा, राज परिवारातील व्यक्तींना सुखरूप दुसऱ्या जागी नेण्याकरिता भुयारी मार्ग बांधले जायचे,
अशा एकापेक्षा एक वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टींना आता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत केवळ कथा-कादंबऱ्यांच्या माध्यमातून वाचलेल्या, सांगोवांगीच्या गप्पातून पुढे आलेल्या ‘भुयारा’च्या गोष्टींच्या चर्चेला उधाण आले आहे.
स्वारगेट परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना सापडलेल्या भुयारांचे वृत्त ‘लोकमत’ने प्रथम प्रसिद्ध केले आणि पुणेकरांचे लक्ष त्या भुयाराकडे गेले. मोठी उत्सुकता व कुतूहलपूर्वक त्यांनी भुयार बघण्याकरिता गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. हे भुयार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी हैराण झाले. कारण त्यांना प्रत्येकाला शिडीद्वारे भुयारात उतरावावे लागत होते.

या भुयाराबाबत इतिहास संशोधक व अभ्यासकांना विचारले असता त्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मते व्यक्त केली. यात मंदार लवाटे यांनी तो भुयारी मार्ग ब्रिटिशकालीन असावा असे मत नोंदविले. तर डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरूव पुरातत्त्वज्ञ डॉ. वसंत शिंदे यांनी शनिवारवाडा व भुयारातील बांधकाम एकसारखे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

भुयारातील बांधकाम ब्रिटिशकालीन
भुयारातील दोन्ही बाजूच्या भिंतीची लांबी साधारणपणे ५७ मीटर इतकी आहे. वरचा भाग गोलाकार आकारात वीट व चुन्यात बांधला गेला आहे. जे पाईप भुयारात आढळून आले त्या पाईपचा व्यास १ फूट इतका असून, ते भिंतीत बसविण्यात आले आहेत. त्यावर ब्रिटिशकालीन मार्क आहेत. ज्या विटांच्या मदतीने बांधकाम करण्यात आले आहे त्यांना पुस्तकी विटा असे म्हटले जाते. त्यामुळे भुयारातील हे बांधकाम ब्रिटिशकालीन असावे असे म्हणता येईल. मुख्यत्वे एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी पाणी वाहून नेण्याकरिता भुयाराची निर्मिती केली असावी. ते पाणी कुठे नेत असावेत याबद्दल मतमतांतरे असू शकतील. त्याकरिता आणखी संशोधन व अभ्यास करावा लागेल. तूर्तास प्राथमिक पाहणीवरून त्याचा उपयोग भुयाराकरिता करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
- मंदार लवाटे, इतिहास अभ्यासक व संशोधक
पेशवेकालीन भुयारी मार्ग
पूर्वी शनिवारवाडा ते पर्वती असा भुयारी मार्ग होता. आता समोर आलेल्या भुयारांच्या माध्यमातून ते पेशवेकालीन असावेत, असे मत मांडावेसे वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे शनिवारवाड्याच्या सुरक्षेकरिता वेगवेगळे भुयारी मार्ग तयार केले होते. या भुयारांचे बांधकाम बघितल्यानंतर हा तोच भुयारीमार्ग दिसतो आहे. भुयाराबद्दल आणखी सांगायचे झाल्यास, त्यात दोन्ही बाजूने जागा सोडली आहे. त्यातून घोडेस्वार जाऊ शकतील एवढी ती जागा आहे. कदाचित सुरक्षा व बंदोबस्ताकरिता या भुयाराचा वापर केला जात असावा. अद्यापही त्याचे बांधकाम मजबूत वाटते. पेशवे शनिवारवाड्यात राहण्यास होते. अचानक शत्रूने शनिवारवाड्यावर हल्ला झाल्यास त्यातील व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी अशा पद्धतीचे मार्ग तयार के ले जात.
- डॉ. वसंत शिंदे, पुरातत्त्वज्ञ व कुलगुरू डेक्कन अभिमत विद्यापीठ
 

Web Title: Metro plan to change under subway?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.