शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पाबळ येथील  ‘त्या ’ मतिमंद निवासी शाळेचा परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 7:52 PM

मुंढवा येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या वतीने शिरुर येथे मतिमंद मुलांची निवासी शाळा चालविली जाते. येथील एक मतिमंद मुलगी गरोदर असल्याचे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उघड झाले होते.

ठळक मुद्देलैंगिक अत्याचारामुळे मतिमंद मुलगी राहिली होती गरोदरयेत्या ३० एप्रिल पासून शाळेचा परवाना संपुष्टात येणारअहवालात शाळा व्यवस्थापनाचे कर्मचाºयांवर नियंत्रण नसल्याचे ताशेरे

पुणे : लैंगिक अत्याचारामुळे मतिमंद मुलगी गरोदर राहिल्या प्रकरणी शिरुर तालुक्यातील पाबळ येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेचा परवाना अखेर रद्द करण्यात आला. अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी नुकताच तसा आदेश दिला असून, येत्या ३० एप्रिल पासून शाळेचा परवाना संपुष्टात येणार आहे. मुंढवा येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या वतीने शिरुर येथे मतिमंद मुलांची निवासी शाळा चालविली जाते. येथील एक मतिमंद मुलगी गरोदर असल्याचे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उघड झाले होते. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल झाला आहे.  या घटनेची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या घटनेनंतर अनेक पालक मुलींना घरी घेऊन गेले होते. तपासणीवेळी अनुदानित ४० विद्यार्थ्यांपैकी २८ आणि विनाअनुदानित २० विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थी उपस्थित होते. शाळेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे छायाचित्रण जतन करुन ठेवण्यात येत नाही. त्यामुळे घटनेची उकल होईल असे छायाचित्रण उपलब्ध नाही. शाळेतील मुलांची नियमित आरोग्य तपासणी होत नसून, मुलींच्या मासिक पाळीची नोंदवही अद्यावत ठेवलेली नाही. शाळा व्यवस्थापनाचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे ताशेरे अहवालात ओढण्यात आले होते. याप्रकरणी अपंग कल्याण आयुक्त पाटील यांच्या समोर सुनावणी झाली. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या मंजिरी देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवलाल जाधव, अ‍ॅड. तुळशीदास बोरकर आणि प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा ढवळे उपस्थित होत्या. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पाटील यांनी संबंधित शाळेचा परवाना रद्द करण्याचा आदेश दिला. तसेच संस्थेतील मुलांचे पुनर्वसन इतर शाळेत करावे, असे आदेश जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिले आहेत.  

टॅग्स :Shirurशिरुरsexual harassmentलैंगिक छळpregnant womanगर्भवती महिला