स्मृतीभ्रंश करुन ९१ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:25 IST2018-04-13T14:21:59+5:302018-04-13T14:25:12+5:30
बाहेरगावाहून आलेल्यानंतर रिक्षाने घरी जात असलेल्या महिलेच्या चेहऱ्यासमोर लाल रुमाल फडकवून तिचा स्मृतीभ्रंश करुन ९१ हजार रुपये लंपास करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ .

स्मृतीभ्रंश करुन ९१ हजारांचा ऐवज लंपास
पुणे : बाहेरगावाहून आलेल्यानंतर रिक्षाने घरी जात असलेल्या महिलेच्या चेहऱ्यासमोर लाल रुमाल फडकवून तिचा स्मृतीभ्रंश करुन ९१ हजार रुपये लंपास करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ हा प्रकार हडपसर गाडीतळ ते भेकराईनगर जकात नाका दरम्यान रिक्षा प्रवास करताना ९ एप्रिल रोजी रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास घडला़ याप्रकरणी आशा पाटील (वय ५५, रा़ ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील या करमाळा येथून हडपसर येथे मुलीच्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या करमाळा येथून आलेल्या बसमधून उतरल्या आणि गाडीतळ येथून भेकराई नगर येथे जाण्यासाठी रिक्षामध्ये बसल्या. त्यावेळी त्यांच्या बॅगमध्ये सोन्याचे दागिने ठेवलेले होते. त्यांच्याशेजारी बसलेल्या २५ वर्षांच्या तरुणाने त्यांच्या चेहऱ्यासमोर लाल रंगाचा रुमाल फडकवला़. त्यामुळे त्यांना चक्कर आल्यासारखे झाले़. त्यानंतर त्यांना काय घडले हे समजले नाही़. घरी गेल्यानंतर त्यांना बॅगेतील दागिने व पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले़. या तरुणाने आपला स्मृतीभ्रंश करत बॅगमधील ८५ हजार रुपये व ६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढून घेऊन लंपास केले, असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे़