शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यनिवडीत राष्ट्रवादीचे वर्चस्व

By admin | Updated: August 22, 2015 02:11 IST

महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांमध्ये (क्षेत्रीय कार्यालयांमध्ये) बिनसरकारी व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली

पिंपरी : महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांमध्ये (क्षेत्रीय कार्यालयांमध्ये) बिनसरकारी व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली. १८ जागांसाठी ११३ इच्छुकांचे अर्ज दाखल झाले होते. स्वीकृत सदस्य निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. ‘अ ’प्रभाग समिती सभेत प्रभागाध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ ला निवडणूक झाली. त्या वेळी सतीश झांबरे, गिरीश कुटे, बेबी नंदा भोंडवे यांची ‘अ’ प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. तर ब प्रभाग समिती सभेत प्रभागाध्यक्ष संदीप चिंचवडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. गोरक्ष पाषाणकर, गिरीश शेंडगे, शरद लुणावत यांची ‘ब’ प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. ‘क’ प्रभाग समिती सभेत प्रभागाध्यक्ष किरण मोटे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. त्या वेळी सतीश काटे, हमीद शेख, गणेश ढोरे यांची ‘क’ प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. तसेच ‘ड’ प्रभाग समिती सभेत प्रभागाध्यक्ष अरुण टाक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. सागर कोकणे, धनंजय मोहिते, शिवाजी पाटोळे यांची ड प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. ‘ई’ प्रभाग समिती सभेत प्रभागाध्यक्षा विनया तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. त्या वेळी विजय रसाळ, प्रकाश सोमवंशी, संजय आहेर यांची ई प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. तर ‘फ’ प्रभाग समिती सभेत पीठासन अधिकारी नारायण बहिरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. पंकज भालेकर, जितेंद्र पवार, प्रवीण भालेकर यांची फ प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीवेळी त्या प्रभागातील प्रभाग अध्यक्ष तसेच सदस्य आणि पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्यांना स्वीकृत सदस्यपदी संधी दिली ते पदाधिकाऱ्यांचे निकटवर्तीय आहेत. कधीतरी पदे देताना पक्ष आपला विचार करेल, संधी देईल अशी अपेक्षा बाळगलेल्या अनेकजण नाराज झाले. त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या. ११३ पैकी १८ जणांना संधी दिली तर ९५ इच्छुकांची नाराजी ओढवली आहे. हे पद राजकीय, पक्षाशी संबंधित नव्हे तर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी होते. तरीही विविध संघटनांच्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले गेले, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)