मेडद गाव बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येणार : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:49 IST2024-12-17T11:49:10+5:302024-12-17T11:49:27+5:30

आयुर्वेदिक महाविद्यालय काही दिवसांत पूर्ण होणार असल्याने या रस्त्याला महत्त्व आलेले आहे

Medad village will come under the jurisdiction of Baramati Municipal Council: Ajit Pawar | मेडद गाव बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येणार : अजित पवार

मेडद गाव बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येणार : अजित पवार

बारामती : बारामती शहर दिवसेंदिवस बदलत आहे. मेडद गाव देखील बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येणार आहे. पुढे आयुर्वेदिक महाविद्यालय काही दिवसांत पूर्ण होणार असल्याने या रस्त्याला महत्त्व आलेले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मेडद येथे एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत ८३ रो-हाऊस , १७ नियोजित असलेल्या १०० रो-हाऊसचे भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेला मूलभूत गरजा आणि योजनांसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून चांगली घरे या ठिकाणी उभी राहणार आहेत. एकता ग्रुपच्या माध्यमातून शाळा, पतसंस्थेने घेतलेल्या भरारीप्रमाणे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, अशीही आशा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रास्ताविक एकता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी केले. ते म्हणाले की, दोन वर्षांत गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून घरे तयार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करणार आहे. प्रत्येक कार्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते. याही प्रकल्पाला बहुमूल्य सहकार्य लाभणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रार्थना करून उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. बांधकामाचा आराखडा पाहून त्यामध्ये भविष्याचा विचार करून काही बदल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे परवेज सय्यद यांनी सांगितले.

सूत्रसंचालन इम्तियाज तांबोळी यांनी, तर आभार सुभान कुरैशी यांनी मानले. यावेळी बहुसंख्य मुस्लीम समाज व विशेषत: महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, बाजार समितीचे सभापती सुनील पवार, सचिव अरविंद जगताप, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विक्रम भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, धनंजय जामदार, गृहनिर्माण संस्थेचे संचालक हाजी रशीद बागवान, आसिफ झारी, सौ. सलमा शेख, अकलाज सय्यद, रिजवान सय्यद, इम्रान मोमीन आदी उपस्थित होते.

Web Title: Medad village will come under the jurisdiction of Baramati Municipal Council: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.