पुणे : लग्नात न दिलेला हुंडा व क्रेडिटकार्डवर काढलेले कर्ज भरण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन यावेत, यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मनीषा सिद्धार्थ दहिरे (वय २६,रा. वडगाव बुद्रुक) असे विवाहितेचे नाव आहे. पती सिद्धार्थ ज्ञानोबा दहिरे (वय ३१,रा.वडगाव बुद्रुक) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह एक महिला अशा दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेची आई लता मोरे (वय ४०, रा. चांदणी चौक, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना वडगाव बुद्रुक येथील ज्योतिर्लिंग अपार्टमेंटमध्ये मंगळवारी दुपारी घडली. मनीषाचा पती सिद्धार्थ हा लग्न झाल्यापासून लग्नात राहिलेला हुंडा घेऊन येण्यासाठी पत्नीचा छळ करत होता. तसेच घरातील सामान भरण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यास सांगत होता. एवढेच नाही तर पतीने त्याच्या क्रेडिट कार्डवर काढलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन यावेत म्हणून तिचा शारिरीक व मानसिक छळ करत होता. त्यामुळे सतत सासरच्या मंडळीकडून होणाºया त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, पत्नीने गळफास घेतल्यानंतर पतीने याची माहिती पोलिसांना न देता परस्पर महिलेची बॉडी खाली उतरून उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याची माहिती फोनवरून पोलिसांना दिली. पुढील तपास उपनिरीक्षक ए.बी. काळे करीत आहेत.00
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 20:36 IST
पती लग्नात राहिलेला हुंडा घेऊन येण्यासाठी पत्नीचा छळ करत होता.
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
ठळक मुद्देआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल