शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

हातवे येथे सासरच्या जाचास कंटाळून अडीच वर्षाच्या मुलीसह विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 9:34 PM

सासरच्या लोकांकडून मुलीचा वारंवार छळ होत होता, तर मुलीस स्वयंपाक येत नाही, पाणी जास्त वापरते, फरशी पुसता येत नाही आदी कारणावरून तिचा छळ होत होता.

ठळक मुद्देयाप्रकरणी पतीसह सासू व नणंद यांना ताब्यात

नसरापूर : भोर तालुक्यातील हातवे येथील विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली असून तिच्या अडीच वर्षांच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत विवाहितेचे वडील दिलीप तळेकर यांनी राजगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू व नणंद यांना ताब्यात घेतले आहे.राजगड पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, नीलम मनोज थिटे (वय ३०, रा. हातवे, ता. भोर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिची अडीच वर्षांची मुलगी शामवी (केतकी) मनोज थिटे हिचा मृतदेह भिलारेवाडी, हातवे येथील शेतातील विहिरीत तरंगताना आढळला आहे. याप्रकरणी पती मनोज दिनकर थिटे, सासू रत्नमाला दिनकर थिटे व नणंद जयश्री दिनकर थिटे यांना राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी राजगड पोलिसांनी अकस्मात आणि आत्महत्या असे दोन गुन्हे दाखल केले आहेत. पती, सासू, नणंद यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद नीलमचे वडील दिलीप तळेकर यांनी दिली आहे. या फिर्यादीमध्ये सासरच्या लोकांकडून मुलीचा वारंवार छळ होत होता, तर मुलीस स्वयंपाक येत नाही, पाणी जास्त वापरते, फरशी पुसता येत नाही आदी कारणावरून तिचा छळ होत होता. यामुळे नीलमने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे .याप्रकरणी मनोज थिटे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाDeathमृत्यूWomenमहिला