माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 10:34 IST2025-12-11T10:33:55+5:302025-12-11T10:34:06+5:30

लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात पती आदित्यचा वाढदिवस असल्याच्या कारणाने सासरच्या मंडळींनी विवाहितेला वडिलांकडून सोन्याचे कडे आणण्याची मागणी केली.

married woman harassed to get money from her husband; Case registered against four people including husband at Airport Police Station | माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

पुणे : माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी विवाहितेचा पती, सासू, सासरे व नणंद अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पती आदित्य अनिल लोखंडे (२८), सासरे अनिल किसन लोखंडे (५३), सासू सुवर्णा अनिल लोखंडे (४८), नणंद समृद्धी अनिल लोखंडे (२५) रा. सर्व मरकळ, ता. खेड अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत २६ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विवाहित व आदित्य लोखंडे यांचे लग्न २२ ऑगस्ट २०२३ रोजी झाले होते. विवाहितेच्या वडिलांना दोन कोटी रुपये खर्च करून धूमधडाक्यात लग्न करून दिले होते. लग्नात ५५ तोळे सोने, दोन किलो चांदीची भांडी, इलेक्ट्रिक वस्तूस फॉर्च्युनर गाडी आदींसह चांगले मानपान दिला होता. लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात पती आदित्यचा वाढदिवस असल्याच्या कारणाने सासरच्या मंडळींनी विवाहितेला वडिलांकडून सोन्याचे कडे आणण्याची मागणी केली.

विवाहितेने ही मागणी वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी ४ तोळे वजनाचे सोन्याचे कडे, २५ हजार रुपयाचे घड्याळ आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ३५ हजार रुपये दिले. त्यानंतर वारंवार पती व सासरच्या मंडळींकडून माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले. तसेच सासऱ्याने विनयभंग केला. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने माहेरी येऊन विमानतळ पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली.

Web Title : दहेज के लिए विवाहिता प्रताड़ित; पति, ससुराल वाले पुणे में मामला दर्ज

Web Summary : पुणे: एक महिला को उसके माता-पिता से पैसे के लिए प्रताड़ित किया गया। पुलिस ने पति और ससुराल वालों पर शारीरिक और मानसिक शोषण का मामला दर्ज किया, जिसमें छेड़छाड़ भी शामिल है। पीड़िता ने लगातार मांगों और यातना की सूचना दी।

Web Title : Woman harassed for dowry; Husband, in-laws booked in Pune

Web Summary : Pune: A woman was harassed for money from her parents. Police booked her husband, in-laws for physical and mental abuse, including molestation. The victim reported constant demands and torture.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.