मराठी सिने व नाट्य अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 02:33 PM2020-09-16T14:33:17+5:302020-09-16T16:04:24+5:30

ललिता देसाई यांनी आचार्य अत्रे यांच्या 'ब्रह्मचारी' नावाच्या नाटकात 'किशोरी' ही व्यक्तिरेखा साकारली होती.

Marathi film and drama actress Lalita Desai passed away in Pune | मराठी सिने व नाट्य अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे पुण्यात निधन

मराठी सिने व नाट्य अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे पुण्यात निधन

Next

पुणे : सिने व नाट्य अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे प्रदीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. आशू यांनी सुमारे साठ वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अर्धशतकाहून अधिक काळ मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीत तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. आचार्य अत्रे यांच्या 'ब्रह्मचारी' या नाटकात त्या किशोरीची भूमिका करत. अत्रे यांच्याच 'लग्नाची बेडी' या नाटकात आशू यांनी रंगवलेली रश्मी रसिकांच्या आठवणीत आहे. त्यांनी नाथ हा माझा, मॅडम यांसारख्या नाटकात काम केले होते. त्यांच्या पाठीमागे पती त्रिहान तसेच एक मुलगा आहे.

ललिता देसाई यांनी आचार्य अत्रे यांच्या 'ब्रह्मचारी' नावाच्या नाटकात 'किशोरी' ही व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच अत्रे यांच्याच लग्नाच्या बेडी चे अनेक नामवंत कलाकारांच्या संचात हजारो प्रयोग यशस्वी रित्या करण्यात आले.  या नाटकातील 'रश्मी '  या भूमिकेला अमाप लोकप्रियता मिळवून देण्यात नटवर्य बापूराव मान्यांपासून स्नेहप्रभा प्रधान, हंसा वाडकर, पद्मा चव्हाण ,अश्विनी भावे यांच्याबरोबरच ललिता देसाई यांची देखील तितकेच मोठे योगदान आहे. दादा कोंडकेच्या अनेक चित्रपटात त्यांनी सहअभिनेत्री म्हणून काम केले आहे.

Web Title: Marathi film and drama actress Lalita Desai passed away in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.