नाना पटोले पंतप्रधानांवर परत टीका केली तर आम्ही वाजवून टाकू ;नारायण राणेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 17:18 IST2021-06-03T16:26:47+5:302021-06-03T17:18:03+5:30

रयत नसताना कसले राजे? संभाजीराजेंवर पण घणाघात

maratha reservation: narayan rane slams nana patole and mp sambhaji raje | नाना पटोले पंतप्रधानांवर परत टीका केली तर आम्ही वाजवून टाकू ;नारायण राणेंचा इशारा

नाना पटोले पंतप्रधानांवर परत टीका केली तर आम्ही वाजवून टाकू ;नारायण राणेंचा इशारा

पुणे : राष्ट्रपती नियुक्त भाजप खासदार संभाजी राजेंवर नारायण राणे यांनी आज घणाघाती टीका केली. तर काँग्रेस चे नेते नान पटोलेंनी पंतप्रधानांवर परत टीका केली तर आम्ही वाजवून टाकू असा थेट इशारा देखील त्यांनी दिला. 

संभाजीराजेंचा मराठा आरक्षणाचा मुद्द्यांवर बोलताना आणि आंदोलनाबाबत विचारल्यावर ते सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्याचे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले." संभाजीराजे यांनी म्हणून कोणी पुढारी बनत नाही. रायगडावर कोण आहेत आंदोलन करायला असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला."

"असं पुढारी बनत नाही. समाजाला वाटले पाहिजे की हे राजे आहेत आमचे. कार्य करावं आपलं. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. रायगडावर कोण आहेत हो? आंदोलन लोकांमध्ये करावं. पेटवायला पण एक धमक लागते. खासदारकी संपता संपता हे सगळे कसे आठवायला लागले. मला त्यांचा मुद्दा पटला तर मी जाईन. राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला. ती कुठे दिसत नाही. जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन कोणी नेता होत नाही "असा टोला देखील त्यांनी लगावला.

दरम्यान काँग्रेस वर आणि नाना पटोले यांचावर देखील त्यांनी टीका केली." नाना पटोले यांना तोडफोड करायची काड्या करायची सवय आहे. ते पक्ष जोडणार नाहीत तर तोडणारे आहेत. परत टीका केली तर नाना आम्ही वाजवून टाकू... भजन " असं राणे म्हणले.

 

Web Title: maratha reservation: narayan rane slams nana patole and mp sambhaji raje