अनेकांचे २ दगडावर पाय; अजित पवार गटाच्या वाटेवर असणाऱ्यांची शरद पवार गटाच्या मुलाखतीला हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:18 IST2025-12-19T13:18:41+5:302025-12-19T13:18:51+5:30
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातून तब्बल २५२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या

अनेकांचे २ दगडावर पाय; अजित पवार गटाच्या वाटेवर असणाऱ्यांची शरद पवार गटाच्या मुलाखतीला हजेरी
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडील २५२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या वाटेवर असणाऱ्यांचीही मुलाखतीला हजेरी होती. त्यामुळे अनेक जण दोन दगडावर पाय ठेवून उभे असल्याचे चित्र या मुलाखतीच्या वेळी दिसले.
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती सकाळपासून १० वाजल्या रात्री ९:३० वाजेपर्यंत सुरू होत्या. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातून तब्बल २५२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर असणाऱ्यांचीही मुलाखतीला हजेरी होती. त्यामुळे अनेक जण दोन दगडावर पाय ठेवून उभे असल्याचे चित्र या मुलाखतीच्या वेळी दिसले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापू पठारे, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, माजी आमदार अशोक पवार, जयदेवराव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, भगवानराव साळुंखे, डॉ. सुनील जगताप, नीलेश निकम, विशाल तांबे, काकासाहेब चव्हाण, अश्विनी कदम, स्वाती पोकळे, उदय महाले, पंडित कांबळे आदी उपस्थित होते.