शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

राजाभाऊ तांबे यांचा मनसेला रामराम

By admin | Updated: July 9, 2015 02:14 IST

दौंड तालुका मनसेचे अध्यक्ष राजाभाऊ तांबे यांनी मनसेला रामराम ठोकून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पारगाव (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

केडगाव : दौंड तालुका मनसेचे अध्यक्ष राजाभाऊ तांबे यांनी मनसेला रामराम ठोकून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पारगाव (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार रमेश थोरात यांनी राजाभाऊ तांबे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.या वेळी अजित पवार म्हणाले, की भाजपा आणि शिवसेना सध्या कलगीतुऱ्यात गुंतले असून, त्यांना सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे भान राहिलेले नाही. राज्य सरकारामधील काही मंत्री बोगस पदवी, चिक्की घोटाळा यांसह अन्य भ्रष्टाचारात अडकलेले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांशी निगडित शेती उत्पादनाबाबत त्यांना महत्त्व वाटत नाही ही खेदाची बाब आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवानंतर नव्याने झालेल्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला चागले दिवस आले. राजाभाऊ तांबे यांना १७ हजार मते विधानसभेला मिळाली, हे कौतुकास्पद आहे. आगामी काळात त्यांना सन्मानाने राष्ट्रवादीत वागणूक दिली जाईल़ राजाभाऊ तांबे म्हणाले की, माझ्या ६ वर्षांच्या कारकिर्दीत मनसेत मला राज ठाकरे यांनी फक्त दोन मिनिटे भेट दिली. पक्षाने कुठलीही ताकद न दिल्याने मला राष्ट्रवादीत प्रवेश घ्यावा लागला. या प्रसंगी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे, अप्पासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सभापती रोहिणी पवार, राजेंद्र कोरेकर, वैशाली नागवडे, अ‍ॅड. अजित बलदोटा, वीरधवल जगदाळे, सत्त्वशील शितोळे, अनंद थोरात, महेश भागवत, रामदास दिवेकर, मधुकर दोरगे, अशोकराव खळदकर, जीवन तांबे, भाऊसाहेब ढमढेरे, सयाजी ताकवणे, किरण मोरे, सुभाष बोत्रे, संभाजी ताकवणे व मान्यवर उपस्थित होते. माऊली शेळके यांनी सूत्रसंचालन केले. नितीन जगताप यांनी आभार मानले.