मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव मुंबईकडे रवाना;पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:24 IST2025-08-28T12:23:56+5:302025-08-28T12:24:08+5:30
मोठ्या संख्येने जमलेल्या गर्दीमुळे कोणताही अप्रिय प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे

मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव मुंबईकडे रवाना;पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी
राजगुरूनगर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील आज दि. २८ रोजी सकाळी जुन्नर येथून येण्यास निघाले आहे. जरांगे पाटील यांना प्रतिसाद देत हजारो वाहने मराठा बांधव पुणे -नाशिक महामार्गावरुन मुंबईकडे जात आहे. पहाटेपासून वाहनाची रीघ लागली आहे. राजगुरूनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार तसेच हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मृति शिल्पांना पुष्पहार अर्पण करून पुढे चाकण -तळेगाव मार्गे मुंबईला निघणार आहे.
पुणे -नाशिक महामार्गावरून पहाटेपासून वाहनाची रीघ लागली आहे. खेड तालुक्यातुन जरांगेंच्या समर्थनात शेकडो वाहनातुन मराठा बांधव जाणार आहे. राजगुरुनगर शहरात शुभेच्छा बॅनर लावण्यात आले. ठिकठिकाणी साऊंड सिस्टिम लावून वातावरण निर्मिती केली जात आहे. शहरात तसेच ठिकाणी ठिकाणी जरांगे यांच्या ताफ्यावरती वरती पुष्पवृष्टी करण्यासाठी ठिकठिकाणी जेसीबी मशीन उभे करण्यात आले आहे. पुणे नाशिक महामार्गावरील जैदवाडी ते खरपुडी फाटा (ता खेड ) या ठिकाणी नमस्कार कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी जवळपास १२५ पोलिस कर्मचारी ,होमगार्ड तैनात करण्यात आले आहे. तालुक्यातील ८० पोलिस पाटील मदतीला उतरले आहे.