शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र हाऊसफुल्ल

By admin | Updated: July 2, 2015 23:57 IST

मागील दोन महिन्यांपासून राज्यातील एकमेव असलेल्या माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात तब्बल ९ बिबट्यांची रवानगी करण्यात आल्यामुळे निवारा

लेण्याद्री : मागील दोन महिन्यांपासून राज्यातील एकमेव असलेल्या माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात तब्बल ९ बिबट्यांची रवानगी करण्यात आल्यामुळे निवारा केंद्र सद्य:स्थितीत हाऊसफुल्ल झाले आहे. सध्या असलेल्या ३६ बिबट्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा पेचप्रसंग व्यवस्थापनाला पडला आहे. निवारा केंद्रात कायमस्वरूपी ठेवण्यात असलेले २७ बिबटे व आता दाखल झालेले ९ बिबटे यामुळे परिस्थिती उद्भवली आहे. तर, बिबट्या प्रवण क्षेत्रात अजूनही काही बिबट्यांचा वावर असल्याने नव्याने पकडलेले काही बिबटे केंद्रात दाखल झाल्यास त्यांच्या निवाऱ्याची, व्यवस्थापनाची अडचण निर्माण होणार आहे.देशात जुन्नर तालुक्यात सर्वांत मोठ्या संख्येने बिबट वन्यप्राण्याची संख्या आढळून आल्याची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे. जुन्नर तालुक्याच्या एकूण ५८८६ चौ.कि.मी. भौगोलिक क्षेत्रापैकी ५७५ चौ.कि.मी. वनक्षेत्र आहे. तर, एकूण २८४३२ हेक्टर बागायत क्षेत्रापैकी ८१५० हेक्टर क्षेत्रामध्ये उसाची शेती करण्यात आलेली आहे. ऊस शेतीच्या माध्यमातून मिळणारा सदाहरित निवारा, पाणी व पाळीव प्राण्याचे भक्षण यामुळे बिबट्यांसाठी ऊसशेती क्षेत्र उत्तम पोषक निवारा झालेला आहे. मनुष्यवस्ती जवळ सहज व जास्त कष्ट न करता बिबट्यास शिकार उपलब्ध होऊ लागल्याने बिबटे वारंवार मनुष्यवस्तीकडे आपला मोर्चा वळवू लागले. यातूनच माणूस व बिबट्या असा संघर्ष सुरू झाला. जुन्नर तालुक्यात सन २००१ पासून बिबट्यांची समस्या निर्माण झाली.मानवीवस्तीत घुसलेले, विहिरीत पडलेले, उपद्रवी नरभक्षक बिबट्यांसाठी सुरुवातीला बंदिस्त, तसेच पत्राशेडमध्ये १६ पिंजरे बनविण्यात आले होते. निवारा केंद्र सन २००६ पासून ‘एसओएस’ या दिल्लीस्थित स्वयंसेवी संस्थेकडे व्यवस्थापनासाठी देण्यात आलेले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांच्या नियोजनातून केंद्राचे व्यवस्थापन केले जाते.