शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

आंबा पिकवा केमिकल फ्री ; अन्यथा कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 19:49 IST

एप्रिल महिन्यात पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा खाण्यास ग्राहक सुरुवात करतात...

ठळक मुद्दे   अन्न व औषध प्रशासन आणि आडते असोसिएशनच्यावतीने आंबा विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण आयोजित रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, केशर, कर्नाटक हापूस, बेगमपल्ली अशा अनेक प्रकारचे आंबे विक्रीसाठीदरवर्षी आंब्यांचा हंगाम सुरु होताना ग्राहकांकडून चांगला दर मिळतो असा विक्रेत्याचा अनुभव

पुणे : एप्रिल महिना सुरु झाला की बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीसाठी येतो. परंतु गेल्या काही वर्षांत आंबा विक्रेते व शेतकऱ्यांकडून आंबा पिकविण्यासाठी मानवी शरीराला हानिकारक रसायनांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा अन्न व औषध प्रशासनाने मार्केट यार्डांतील आंबा विक्रेत्यांचे प्रशिक्षण घेतले. कायद्याने बंदी घातलेल्या कोणत्याही रसायनांचा वापर करणा-यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.     अन्न व औषध प्रशासन आणि आडते असोसिएशनच्यावतीने आंबा विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. एप्रिल महिन्यात पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा खाण्यास ग्राहक सुरुवात करतात. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, केशर, कर्नाटक हापूस, बेगमपल्ली अशा अनेक प्रकारचे आंबे विक्रीसाठी येतात. दर वर्षी आंब्यांचा हंगाम सुरु होताना ग्राहकांकडून चांगला दर मिळतो असा विक्रेत्याचा अनुभव आहे. यामुळे विक्रेत्यांकडून स्वस्तातला कच्चा माला रसायनांचा वापर करून विकला जातो. ग्राहक देखील महागाचे आंबे विकत घेतात. रसायनांचा वापर केलेली फळे आरोग्यास किती अपायकारक याचा विचार केला जात नाही.  रसायनांचा परिणाम पोटाच्या आतड्यांवर आणि किडनीवर होत असतो. फळांमधली जीवनसत्वे रायायनिक पदाथामुर्ळे नष्ट होऊन जातात. विशेषत: लहान मुलांच्या किडनी आणि आतडयावर रसायनांचा जास्त परिणाम होतो. रायानिक औषधांमध्ये साठवून ठेवलेली फळे पाण्यात टाकल्यानंतर शरीरातली हाडे ठिसून करणारे फॉस्फेरिक  अ‍ॅसिड तयार होते, असे सांगण्यात आले. ---------कॅल्शियम कार्बाईड पूर्ण बंदी या कॅल्शियम औषधांपासून अ‍ॅसिटीलीन नावाचा वायू तयार होतो.या वायूचा परिणाम थेट मानवाच्या मेंदूवरच होतो. लवकर पिकविलेली फळे खाल्यावर ताप, मळमळ, उलट्या, जुलाब आदी परिणाम होतात. यामुळे कॅल्शीयम कार्बाईडला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कायद्यात बदल करून इथेपॉन हा रासायनिक पदार्थ फळे पिकविण्यासाठी वापरण्यास शासनाने परवानगी दिली आहे. इथेलॉन गॅस पावडर स्वरुपात फळांच्या प्रत्यक्ष संर्पकात न आणता पाकिटात वापरुन फळे पिकविण्यासाठी वापरता येऊ शकते. त्यामुळे कायद्यानुसार परवानगी असलेल्या औषधांचाच वापर करून फळे पिकवणे आवश्यक आहे. - उ.वि.इंगवले, अन्न सुरक्षा अधिकारी---------------ग्राहकांच्या हितासाठी आडते  असोसिएशनचा उपक्रमएप्रिल महिन्यांपासून रत्नागिरी, आंध्रप्रदेश, कर्नाटक भागातून आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीला येतो. आंब्यांचा हंगाम सुरु झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई  सुरु केली जाते. यामध्ये काही विक्रेते सापडल्यावर त्याचा परिणाम संपूर्ण आंबा मार्केटवर होतो.  ग्राहकांचे हित लक्षात घेऊन आंबा पिकविण्यासाठी रासायनिक  औषधांचा वापर टाळण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात आले. - रोहन उरसळ, आंबे विक्रेते व आडते असोसिएशनचे सचिव

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाFarmerशेतकरी