शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

मानापमान नाट्यावर पडदा?

By admin | Updated: January 6, 2015 00:06 IST

नियोजनात सहभागी न करून घेतल्याने नाराज झालेल्या महिला आणि बालकल्याण समिती सदस्यांची समजूत आता खासदार सुप्रिया सुळे काढणार आहेत.

पुणे : महापालिकेकडून नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या महिला महोत्सवाच्या नियोजनात सहभागी न करून घेतल्याने नाराज झालेल्या महिला आणि बालकल्याण समिती सदस्यांची समजूत आता खासदार सुप्रिया सुळे काढणार आहेत. या महोत्सवाच्या उद्घाटनावर समिती सदस्यांनी बहिष्कार घातल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राष्ट्रवादीच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सुळे यांच्यासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन समिती सदस्यांना सोमवारी दिले. त्यासाठी महापालिकेत खास बैठक बोलविण्यात आली होती. पालिकेच्या सलग दोन महिला महोत्सवात मानापमान नाट्य घडल्यानंतर, या वर्षीच्या महिला महोत्सवातही मानापमान नाट्य रंगले. महापालिकेकडून शनिवारपासून सुरू करण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती, मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती, रमाबाई रानडे, वीरमाता राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने आयोजित महिला महोत्सवाच्या उद्घाटनास महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्यांनीच दांडी मारली. या महोत्सवाच्या आयोजन समितीत महिला आणि बालकल्याण समितीच्या एकाही सदस्यास न घेतल्याने तसेच महिलांसाठी असलेल्या या महोत्सवाच्या कार्यक्रमांचे नियोजन महिलांना न विचारताच पक्षनेत्यांनी केल्याने हा बहिष्कार टाकण्यात आला. त्यावर आपला पुढील निर्णय जाहीर करण्यासाठी समितीची आज खास बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत या महोत्सवाबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच महापौर दत्तात्रय धनकवडे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बैठक घेण्यात येणार असल्याचे सभागृह नेते सुभाष जगताप यांनी सांगितले. या वेळी या सदस्यांनी आपल्या सूचना द्याव्यात, असे सांगण्यात आले आहे. तक्रार करणाऱ्या सदस्यास बोलू दिले नाहीसोमवारी झालेल्या खास बैठकीनंतर या महोत्सवाच्या नियोजनात आमची काहीही भूमिका राहणार नसली, तरी आमची नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक बोलावल्याचे काही सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर या बैठकीत तक्रार करणाऱ्या काँग्रेस सदस्यास बोलू न दिल्याचेही सदस्यांनी सांगितले. ४या प्रकरणी सावध पवित्रा घेत या बैठकीनंतर सर्व सदस्यांची नाराजी दूर झाली असून, या पुढील कार्यक्रमांना सर्व समिती सदस्य उपस्थित राहणार असल्याचे समितीच्या अध्यक्षा सुनंदा देवकर यांनी सांगितले.