शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो वर्षांची कुटुंबाची परंपरा राखणारा वारकरी..; ऐसे असावे सख्यत्व! विवेक धरावे सत्व!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 13:40 IST

कोरोना विषयीची सगळी काळजी घेत त्यांच्या पावलांनी धरलीय पंढरीची वाट....

- रविकिरण सासवडे- बारामती : आषाढी वारी सोहळा रद्द झाला म्हणून काय झालं घराण्याची शेकडो वर्षाची परंपरा कशी मोडणार?  गर्दी होऊ नये, आजार पसरू नये म्हणून तर त्या (फिजिकल डिस्टन्स) नियमांचे पालन करीत एकटाच पंढरीची वाट चालतोय.  रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे “ ऐसे असावे सख्यात्व,  विवेके धरावे सत्व,  भगवंतावरील ममत्व,  सांडोचि नये”,  अशा शब्दात 62 वर्षाचे भरत वामन वनवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  सासवड येथील संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळा प्रस्थानानंतर भरत वनवे यांनी एकट्यानेच पंढरपूरच्या दिशेने पायी वारी सुरू केली. पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर ते पाचव्या दिवशी बारामती शहरात पोहचले.  कपाळावर अबीरबुक्का, तोंडाला मास्क,   खांद्यावर भगवी पताका,  पाठीवर दोन पिशव्या बांधून मुखाने अखंड ‘राम कृष्ण हरी’ जयघोष करीत भरत वनवे हिमतीने पंढरपूरची वाट चालत आहेत.  वारीसोहळा रद्द झाला तरी तुम्ही एकट्यानेच वारी का करताय,  असे विचारले असता ते म्हणाले ‘ माझ्या घराण्यामध्ये महिन्याच्या वारीची परंपरा आहे.  माझ्या आजोबापासून ती सुरू झाली. मी केंव्हा वारी सुरू केली हे मला सुद्धा आठवत नाही. यंदा वारी करताना आजराची भीती सगळीकडे आहे. त्यामुळं ठरवलं एकट्यानेच वारी करायची संगती कोणाला घ्यायचं नाही. संकल्प सोडला आणि निघालो. आतापर्यंत तरी सगळं विठ्ठलकृपेने व्यवस्थित पार पडलाय.  येथून पुढेसुद्धा तोच तारून नेईल असा विश्वास भरत वनवे व्यक्त करतात.  

….................

वारीमध्ये विठ्ठल भेटतो... भरत वनवे हे पंढरपूर येथील रहिवाशी आहेत.  दर महिन्याला ते सासवड येथे संत सोपानकाका यांच्या संजीवन समाधी दर्शनास येतात. यंदा आषाढी वारी सोहळ्यासाठी ते पायी सासवडहून पंढरपूरकडे निघाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आहार आणि निवाऱ्याची सोय कशी करता असे विचारले असता,  ते म्हणाले,  बाळा  वारीत विठ्ठल भेटतो. कधी निवाऱ्याच्या रूपाने तर कधी आहाराच्या रूपाने.  खुप वर्षांच्या परिचयामुळे या वाटेनं अनेक ऋणानुबंध जोडले गेलेत. अशा आजार काळातसुद्धा कोणी तिरस्कार केला नाही.  प्रत्येक घरातील माऊलीने हसतमुखाने जेऊ घातले. बाबा पुढील मुक्कामाला तुम्हाला गाडीवरून सोडतो, असे म्हणल्यावर त्यांनी नम्रपणे नकार देत टाळाच्या ठेक्यात आणि अखंड नामघोष करीत आपली वाट धरली.  

टॅग्स :BaramatiबारामतीPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीFamilyपरिवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस