शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात माळेगावची घुसखोरी; निकोप स्पर्धेला गालबोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:57 IST

परवानगीविना ऊसतोड टोळ्या, वाहने उतरवल्याने सोमेश्वर कारखाना व्यवस्थापन नाराज

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे गाळपासाठी स्वतःचा पुरेसा ऊस उपलब्ध असतानाही, इतर साखर कारखान्यांकडून सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात थेट घुसखोरी सुरू झाल्याने साखर उद्योगात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सख्खा शेजारी असलेल्या माळेगाव साखर कारखान्याने अलीकडच्या अनेक वर्षांत प्रथमच सर्व अलिखित संकेत धुडकावून सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात दहा ते बारा ऊसतोड टोळ्या पाठवल्याचा आरोप होत आहे. यामुळे आतापर्यंत जपली गेलेली निकोप स्पर्धा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढली असून, काही कारखान्यांनी क्षमतेचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण केले आहे. परिणामी पुणे जिल्ह्यासह सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये उसासाठी चढाओढ वाढली आहे. या स्पर्धेत अनेक कारखाने थेट पुणे जिल्ह्यातील ऊस पळवत असल्याचे चित्र आहे.

सोमेश्वर साखर कारखान्याने गेल्या काही वर्षांत अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिमा राबवत सिंचन योजनांच्या माध्यमातून ऊस क्षेत्रात लक्षणीय वाढ केली. उपलब्ध ऊस क्षेत्राचा अभ्यास करून कारखान्याने योग्य ते विस्तारीकरण केले आहे. सध्याच्या हंगामात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप चालेल आणि १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सोमेश्वरची पहिली उचल टनाला ३३०० रुपये असून, अंतिम दर उच्चांकी राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

मात्र, जिराईत भागातील काही शेतकरी ऊसतोडीची घाई करत माळेगाव कारखान्याकडे ऊस देऊ लागल्याचे चित्र आहे. मोरगाव, सुपे, जेजुरी या पट्ट्यात माळेगाव कारखान्याने परवानगीशिवाय टोळ्या व वाहने उतरवल्याचा आरोप सोमेश्वर व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, “सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती हे कारखाने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेली तीन दशके परस्पर समन्वयाने काम करत आहेत. आमच्यात काही अलिखित करार व संकेत आहेत. त्यानुसार परवानगी किंवा कराराशिवाय एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस न नेण्याचे समान धोरण आहे. स्पर्धा दराची, उताऱ्याची व गाळपाची असावी. मात्र, ती निकोप असली पाहिजे. दुर्दैवाने माळेगावच्या काही टोळ्या सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडत आहेत.”

सोमेश्वर कारखान्याचा दर जाहीर

सोमेश्वर साखर कारखाना १ फेब्रुवारीपासून पहिली उचल टनाला ३४०० रुपये, तर १ मार्चपासून ३५०० रुपये प्रतिटन देणार आहे. शिवाय अंतिम दर दिवाळीत उच्चांकी दिला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Malegaon encroaches Someshwar's territory, disrupting fair competition in sugar industry.

Web Summary : Malegaon sugar factory allegedly encroaches on Someshwar's sugarcane territory, sparking industry concern. Despite Someshwar's sufficient sugarcane, Malegaon sent harvesting teams, violating agreements. Someshwar raised prices, offering ₹3500/ton in March, while condemning the unfair competition threatening established norms.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र