शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वडीलधाऱ्यांवर टीका करण्याची आपली संस्कृती नसल्याचा अजित पवार यांना पडला विसर;रंजन तावरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:35 IST

चंद्रराव तावरे यांच्या वयावर अजित पवार बोलतात, त्यांचे वय झाले, त्यांची स्मरणशक्ती कमी झाली, त्यांना विस्मरण होत आहे, चंद्रराव तावरे हे तुमचे काका शरद पवार यांच्याच वयाचे आहेत, याचे तरी भान अजित पवार यांनी ठेवावे.

माळेगाव : सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांनी आयुष्यातील ४५ वर्षे सहकारात खर्ची केली. त्यातून सभासदांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येऊन सभासदांची उन्नती झाली. चंद्रराव तावरे यांच्या वयावर अजित पवार बोलतात, त्यांचे वय झाले, त्यांची स्मरणशक्ती कमी झाली, त्यांना विस्मरण होत आहे, चंद्रराव तावरे हे तुमचे काका शरद पवार यांच्याच वयाचे आहेत, याचे तरी भान अजित पवार यांनी ठेवावे. वडीलधाऱ्यांवर टीका करण्याची आपली संस्कृती नसल्याचा विसर अजित पवार यांना पडल्याची टीका माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केली आहे.

माळेगाव खुर्द येथे सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या सभेत तावरे बोलत होते. यावेळी तावरे पुढे म्हणाले, अजित पवार सहकाराचे पुरस्कर्ते नसून ते सहकाराचे मारेकरी आहेत. त्यांनी कर्जत तालुक्यातील जगदंबा कारखाना तसेच कोरेगाव तालुक्यातील शालिनीताई पाटील यांचा जरांडेश्वर कारखाना सभासदांच्या ताब्यातून हिसकावून घेतला. स्वतःची खासगी मालकी प्रस्थापित केली आहे, तर ते कसे सहकाराचे पुरस्कर्ते झाले. त्यामुळे त्यांच्यावर माळेगाव कारखान्याचा सभासद कदापि विश्वास ठेवणार नाही, असेही ते म्हणाले.

माळेगाव कारखान्याच्या सभासदांचा विकास हा केवळ चंद्रराव तावरे यांच्यामुळे झाला. ५८ वर्षे लोकसभेला व विधानसभेला तालुक्याने नेहमीच पवारांना साथ दिली. सर्व काही तुम्हालाच दिलं तरी तुम्ही समाधानी नाही. माळेगावची निवडणूक पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे, त्यांना काही करून माळेगाव कारखाना ताब्यात घ्यायचा आहे. माळेगावच्या सभासदांनी आपल्या मुला-बाळांच्या भविष्याचा विचार करून मतदान करावे, असे आवाहन तावरे यांनी केले.

अजित पवार सत्तेचा गैरवापर करून दमदाटी व दडपशाही करतात. त्यांच्या झुंडशाहीला सभासद मतदानातून नक्कीच उत्तर देतील आणि सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करतील, अशी आम्हाला खात्री आहे. -  ॲड. श्यामराव कोकरे

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसElectionनिवडणूक 2024