शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळे बारामती व्यापारी केंद्र बनले; ज्येष्ठ नेते शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 15:09 IST

छोटे व्यापारी गावाची अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी छोट्या व्यावसायिकांच्या अडचणीत संघटना प्रमुखांनी लक्ष घाला

बारामती : बारामती शहर आणि तालुका दोन गोष्टींसाठी पुर्वीपसुन प्रसिध्द आहे. काळ्या आईची सेवा करणारा कष्टकरी शेतकरी, ज्या शेतकऱ्याने कष्टाने शेती उत्पादन वाढवलं. कारखानदारी उभी करुन लोकांच जीवन समृध्द केले. शेती जशी संपन्न होते. तसा व्यापार वाढतो. बाजारात खरेदी करण्याची ताकत वाढली की व्यापार समृध्द होतो. त्यामुळे बारामती व्यापारी केंद्र बनले असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

बारामती येथे आयोजित स्वाभिमानी व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी पवार पुढे म्हणाले, त्या काळात बारामतीत कापसाच्या जीन बघायला मिळायच्या. आपल्या भागात कापूस आणि गुळाची बाजारपेठ  होती. माळेगांव, सणसरचा कारखाना झाल्यानंतर गुऱ्हाळे बंद झाली. साखर आल्यानंतर  बाजारपेठ वाढली. लोकांची क्रयशक्ती वाढली. देश आणि राज्य पुढे जाण्यासाठी व्यापार वाढला पाहिजे. बारामतीत व्यापार संघटना अनेक वर्ष काम करते. पण यामध्ये छोट्या लोकांचा विचार नव्हता. हे आज लक्षात आले. छोटे व्यापारी गावाची अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी हातभार लावतात. या छोट्या व्यावसायिकांच्या अडचणीत संघटना प्रमुखांनी लक्ष घाला. काही अडचणी असल्याच आमच्याशी संपर्क साधा. निवडणुकीची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर या व्यापाऱ्यांची पुन्हा बैठक घेऊ असं पवार म्हणाले.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी लढाइ कोणाशी नाही. महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचे पाप करणाऱ्या अदृश्य शक्तीशी माझी लढाइ असल्याचे सुळे यांनी सांगितले. यावेळी संयोजक आणि मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड सुधीर पाटसकर यांनी हा मेळावा होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले, दमदाटीचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. तसेच संयोजक विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी बारामतीत ठराविक ठेकेदारांनाच ‘अबोव्ह’ ने टेंडर दिले जात असल्याचा आरोप केला. बारामतीत मोठी दडपशाही सुरु असल्याचा आरोप सस्ते यांनी देखील केला. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत लक्ष घालण्याची मागणी केली.यावेळी सदाशिव सातव, अॅड संदीप गुजर, सतीश खोेमणे, सत्यव्रत काळे, पाैर्णिमा तावरे ,निलेश कोठारी आदी उपस्थित होते.

नमो महारोजगार मेळाव्यात ४३ हजार जणांना रोजगार देणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात १० हजार जणांनाच नोकऱ्या दिल्या. त्या नोकऱ्या देखील ८ मे पर्यंतच दिल्या आहेत का,ते ‘चेक’ करा. अॅप्रेंटीसशिप नोकर्या दिल्या आहेत का, एवढा खर्च करुन पदरात काय पडले, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. लोकांना असं बऱ्याच वेळा वाटत आता काय, पण आता काही नाही. एकदा निर्णय घेतला. कोणीतरी आपल्याकडुन काढुन घेतल. किती दिवस आता रडत बसायच नाही. माझ्या आत्याचे स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल. ‘साहेबां’नी सरोज पाटील यांना सांगितले, शारदाबाई पवार यांनी आम्हाला रडायला नाही, लढायला शिकवलं. त्यामुळे झाल गेले ‘इटस ओके’. मागितले असते तर सगळं प्रेमाने दिले असते. कारण देण्यात जी मजा आहे, ती घेण्यात नाही. कोणी आदराने प्रेमाने काही मागितले ते देण्याची आपली देणारी संस्कृती आहे. मी स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. दमदाटी करुन काढुन घेतलं तर इच्छा असेल तरी देणार नाही, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसbusinessव्यवसायSugar factoryसाखर कारखाने