शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस विनयभंग प्रकरणात रासनेंनाही सह आरोपी करा; धंगेकरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:53 IST

विनयभंग प्रकरण घडले तेव्हा हेमंत रासने त्याठिकाणी होते, त्यांनी कोंढरेला कुठलाही जाब विचारला नाही

पुणे: भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढरे याने दोन दिवसांपूर्वी शनिवारवाडा परिसरात एका पोलीस अधिकारी महिलेचा विनयभंग केला. या प्रकाराचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर प्रमोद कोंढरे याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा संपूर्ण प्रकार कसल्याचे आमदार हेमंत रासने यांच्यासमोर घडला. त्याचवेळी हेमंत रासने यांनी प्रमोद कोंढरे याला समज देणे आवश्यक होते. मात्र असे काहीही घडले नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात हेमंत रासने यांना देखील सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

धंगेकर म्हणाले, प्रमोद कोंढरे नराधम या महिला भगिनीला ज्या पद्धतीने स्पर्श करत होता. हा सगळा निंदनीय प्रकार पुणेकरांनी पाहिला. हेमंत रासने त्या ठिकाणी होते. त्यावेळी त्यांनी कुठल्याही प्रकारचा जाब कोंढरेला विचारला नाही. परंतु ही महिला जेव्हा वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार करायला गेली. तेव्हा हेमंत रासने त्यांच्यावर दबाव आणत  होते. आणि केस मागे घेण्यास सांगत होते. कुठल्याही दबावाला ती बळी पडली नाही. महिलेचं खरतर कौतुक करायला हवं. त्या महिलेने पोलिसांचा मानसन्मान वाढवला. पोलिसांना माझी विनंती आहे की,  हेमंत रासने सारख्या आमदाराला सहआरोपी करावं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.  मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याची दखल घ्यावी. त्या कार्यकर्त्यावर कडक कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती करतो. पुण्यात भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते यांची वागणूक चांगली नाही. पूर्वीही यांच्याकडून असे प्रकार घडले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी.

महाराष्ट्रात युतीचे सरकार आहे त्याचे आम्हाला भान आहे. मात्र, पुण्यातील भाजपचा पदाधिकारी ड्युटीवर असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करीत असेल तर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या पुण्यात शिवसेना गप्प बसणार नाही. या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्याचा माज आम्ही उतरवू असे सांगून रवींद्र धंगेकर म्हणाले की, यापूर्वी देखील याच भाजपा पदाधिकारी असणाऱ्या प्रमोद कोंढरे याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वैशाली नागवडे यांचाही विनयभंग केला होता आणि त्याचा गुन्हा ही नोंदवण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा शिवसेनेतर्फे आम्ही करू. हे प्रकरण दाबले जाणार नाही, याची ग्वाही आम्ही पुणेकरांना देतो. या स्त्रीलंपट प्रमोद कोंढरे सारख्या पदाधिकाऱ्याला, मित्रपक्ष भाजपने पक्षातून त्वरित काढून टाकावे अशी मागणी करून, याप्रसंगी कसब्याचे भाजपचे आमदार हेमेंत रासने उपस्थित होते त्यांनी या बाबतीतचे मौन सोडवे असे आव्हान धंगेकर यांनी केले.

टॅग्स :Puneपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरMLAआमदारPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती