शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरमध्ये १० व्हेंटिलेटर बेडचे कोविड हॉस्पिटल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:12 IST

--- शिरूर : शिरूर शहरात १०० ऑक्सिजन बेड व १० व्हेंटिलेटर बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी शिरूर ...

---

शिरूर : शिरूर शहरात १०० ऑक्सिजन बेड व १० व्हेंटिलेटर बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी शिरूर शहरातील शिरूर शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आय या विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे करण्यात आले आहे.

याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार, शिरूर उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार शिरूर लैला शेख यांना देण्यात आले आहे. या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे शहराध्यक्ष ॲड. रवींद्र खांडरे, यांनी माहिती दिली आहे.

कोविड १९ ची दुसऱ्या लाटेत शिरूर शहराला मोठा फटका बसला असून, १ एप्रिल ते आजपर्यंत सरासरी १५ ते ३० पेशंट दररोज कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. साधारणपणे शहरात एका महिन्यात ५०० ते ९०० कोविड रुग्ण आढळून आलेले आहेत. ज्या प्रमाणात रुग्ण आढळतात त्या प्रमाणात त्यांना औषध व उपचार मिळत नाहीत. त्यांच्या विलगीकरणाची सोय केलेली आहे. परंतु रुग्णांना लागणारे ऑक्सिजन बेड फक्त ३० आहेत ते तोकडे पडतात. त्यामुळे शिरूर शहरातील अनेक लोकांना कोविड १९ च्या आजारामुळे वेळेवर ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने मृत्युमुखी पडावे लागलेले आहे.

शिरूर शहर पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असून त्या दोन तालुक्यांतील कोविड संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात शिरूरच्या खासगी व ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याने शिरूर शहरवासीयांना वेळेवर ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाही. शिरूर शहरात मोठ्या प्रमाणावर मोलमजुरी करून उपजीविका करणारे गोरगरीब लोक असून, त्यांना खासगी रुग्णालयाचे बिल देणे अशक्य असते. त्यामुळे शिरूर शहरातील अनेक लोकांना कोविड १९ च्या आजारामुळे वेळेवर ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध उपलब्ध न झालेले रुग्णांना मृत्युमुखी पडावे लागलेले आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांनी कोविड १९ च्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात केलेल्या अंदाजामुळे मागण्यांचा अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे शहराध्यक्ष ॲड. रवींद्र खांडरे यांनी दिली.