शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भुशी डॅम परिसरात मोठी घटना; बाजूला असलेल्या धबधब्यातून ५ पर्यटक मुले धरणात वाहून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 16:44 IST

जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते, पाण्याच्या या प्रवाहामुळे चार ते पाच पर्यटक पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले

लोणावळा : भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून 4 ते 5 पर्यटक मुले धरणात वाहून गेले असल्याची भीती वर्तवली जात आहे. या पर्यटकांचा शोध शिवदुर्ग रेसक्यू पथकाच्या मदतीने सुरु आहे. आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.      लोणावळा परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक रेल्वेचे विश्रांती गृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यातून वाहणाऱ्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत होते. दरम्यान सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते, पाण्याच्या या प्रवाहामुळे चार ते पाच पर्यटक पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले आहेत. ही माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह त्यांची टीम तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोध मोहीम सुरू केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार ही मुले वानवडी येथील सय्यदनगर भागातील आहेत.

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाDamधरणWaterपाणीRainपाऊसSwimmingपोहणे