पुणे - सातारा महामार्गावर मोठा अपघात; सहा ते सात वाहने एकमेकांवर आदळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 21:05 IST2022-11-07T21:05:18+5:302022-11-07T21:05:28+5:30
ट्रॅव्हल्स मधील इतर पाच ते सहा जण गंभीर जखमी

पुणे - सातारा महामार्गावर मोठा अपघात; सहा ते सात वाहने एकमेकांवर आदळली
पुणे: पुणे - सातारा महामार्गावरील दरीपुलावर मोठा अपघात झाला आहे. अपघातात सहा ते सात वाहने एकमेकांवर आदळली असून ५, ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नीता ट्रॅव्हलची बस कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाला असून , ट्रॅव्हल्स चालक तसेच ट्रॅव्हल्स मधील इतर पाच ते सहा जण गंभीर जखमी आहेत. त्यांना इतर प्रवाशांच्या मदतीने दवाखान्यात भरती केले आहे. त्याचबरोबर इतर सहा ते सात वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्याचे तसेच मदत कार्य सुरू असल्याचे भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी सांगितले.