शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

वाघोली येथील महावितरणची भूमिगत केबल धोकादायक

By admin | Updated: May 9, 2017 03:32 IST

महावितरणच्या वाघोली २२ केव्ही भूमिगत केबल टाकण्याचे काम वीज मंडळाचे काम सर्व शासकीय नियमांना डावलून असल्याचा

लोकमत न्यूज नेटवर्कआव्हाळवाडी : महावितरणच्या वाघोली २२ केव्ही भूमिगत केबल टाकण्याचे काम वीज मंडळाचे काम सर्व शासकीय नियमांना डावलून असल्याचा आरोप आणि शेतकरी लोणीकंद पोलीस ठाण्याला कामाची परवानगी पाहण्यासाठी गेले असता, संबंधित शेतकऱ्यांना लोणीकंद पोलीस दमदाटी करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी जनशक्ती विचार मंचाचे प्रदीप कंद यांनी केला आहे.वाघोली २२ केव्ही भूमिगत केबल (वीजपुरवठा करणारी केबल) टाकण्याचे काम महावितरण कर्मचारी करत असलेल्या जमिनीत पाच फूट खोल गाडून घ्यावी, केबल उघड्यावर राहिल्याने धोका होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीकाळात वीजपुरवठा खंडित राहिल्याने वीजग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, असे मत प्रदीप कंद, अनिल मगर, रूपेश गावडे, सागर झुरंगे, विजय वाळुंज बाजीराव पाचरणे, सोमनाथ आव्हाळे आदी ग्रामस्थांनी बोलताना सांगितले. ठेकेदाराचे कामगार पुणे-नगर रोड बाजूपट्टी न सोडता बाजूपट्ट्यातून खोल न खणता उघड्यावरच केबल असल्याने अपघात घडण्याची शक्यता असल्याने संबंधित ठेकेदार, अधिकारी यांची चौकशी व्हावी व ठेकेदाराची मान्यता रद्द व्हावी, अशी मागणी ऊर्जामंत्री महाराष्ट्र, जिल्हाधिकारी पुणे, आमदार शिरूर, हवेली, मुख्य अभियंता इन्फ्रा मुंबई/पुणे, मुख्य अभियंता रास्ता पेठ वीज मंडळ, कार्यकारी अभियंता प्रकल्प विभाग पुणे, लोणीकंद पोलीस ठाणे व ग्रामपंचायत लोणीकंद आदीकडे केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संपर्क साधला असता होऊ शकला नाही. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की सार्वजनिक बांधकाम विभागाचा परवाना लोणीकंद पोलिसांकडे परवानगी प्रत दिलेली आहे, तर लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील म्हणाले, की वीज वितरण कंपनीने कसलीही परवानगी मागणीपत्र पोलीस ठाण्याला दिलेले नाही. परिसरातील शेतकरी परवानगी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलीस ठेकेदाराची बाजू घेत असल्याचा प्रदीप कंद यांचा संतापजनक आरोप.