महाविकास आघाडीचे नेते व मंत्र्याकडून रेस ट्रॅकवर गाडी पार्किंग करण्याचा प्रकार निषेधार्ह: प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 08:25 PM2021-06-28T20:25:18+5:302021-06-28T20:29:50+5:30

ट्रॅकवरून गाड्या नेणे म्हणजे खेळाडूंसाठींच्या पवित्र वास्तूचा अवमान करण्यासारखं आहे.

Mahavikas Aghadi leader and minister parking of vehicles on race track prohibited : Pravin Darekar | महाविकास आघाडीचे नेते व मंत्र्याकडून रेस ट्रॅकवर गाडी पार्किंग करण्याचा प्रकार निषेधार्ह: प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

महाविकास आघाडीचे नेते व मंत्र्याकडून रेस ट्रॅकवर गाडी पार्किंग करण्याचा प्रकार निषेधार्ह: प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

Next

पुणेबालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात धावपटूंसाठी तयार केलेल्या सिंथेटिक रेस ट्रॅकवर व्हीआयपी गाड्या नेेण्यासह पार्क करण्यावरुन क्रीडा क्षेत्रासह सर्वच स्तरावरून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. त्यात भाजपही आघाडीवर आहे. आता विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी याच प्रकारावरून टीकेची झोड उठविली आहे. 

राज्यातील क्रीडा संकुलांची देखभाल नीट करण्याची गरज असताना महाविकास आघाडी मधील नेते व मंत्री पुणे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुलातील रेस ट्रॅकवर गाड्या उभ्या करून खेळाडूंच्या भविष्याचा ट्रॅक उद्ध्वस्त करत आहेत, त्यांची ही कृती निषेधार्ह आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.  

दरेकर म्हणाले, राज्यात अगोदरपासूनच क्रीडा सुविधा कमी आहेत त्यामुळे त्या ट्रॅकची नासधूस करू नये. रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या आणताना काळजी घेण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्रात स्पोर्ट्सचं वैभव आहे. त्या ट्रॅकवर स्पर्धक ऑलिंपिकसाठी सराव करतात, स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवत असतो. महाविकास आघाडी सरकारकडून एक दीड वर्षात स्पोर्ट्सला चालना देण्यात आली नाही.ट्रॅकवरून गाड्या नेणे म्हणजे खेळाडूंसाठींच्या पवित्र वास्तूचा अवमान करण्यासारखं आहे. त्यामुळे या प्रकाराचा मी निषेध व्यक्त करतो,अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.

...संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी; भाजपचं निवेदन 
क्रीडा संकुलातील हे ट्रॅक अतिशय कुशलतेने बनवल्या जातात व त्यांची नियमित काळजी घ्यावी लागते. तसेच ह्या ट्रॅकविषयी क्रीडापटुंच्या मनामध्ये आपुलकीची भावना असते. क्रीडापटूंच्या भावनांची थट्टा उडविणारे हे कृत्य करणाऱ्या नेत्यांचा व त्यांच्या या कृतीचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे या नेत्यांच्या उद्दामपणामुळे या सिंथेटिक ट्रॅक चे झालेले नुकसान हे संबंधित नेत्यांकडून वसूल करण्यात यावे व ट्रॅकपर्यंत नेत्यांच्या गाड्यांना सोडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन क्रीडा संकुलात देण्यात आले आहे.

Web Title: Mahavikas Aghadi leader and minister parking of vehicles on race track prohibited : Pravin Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app