शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची पहिली हेलिकॉप्टरचालक

By admin | Updated: March 8, 2015 01:12 IST

मोठी झाली की वैमानिक बनणार व एक दिवस घरावरून विमान नेणार... असे धाडसी स्वप्न पाहत वडगावशेरी येथील अरूणिमा विधाते हिने ते पूर्ण केले

बेनझीर जमादार ल्ल पुणेप्रत्येक व्यक्तीचे काही ना काही स्वप्न असते. जसे की, मोठी झाली की वैमानिक बनणार व एक दिवस घरावरून विमान नेणार... असे धाडसी स्वप्न पाहत वडगावशेरी येथील अरूणिमा विधाते हिने ते पूर्ण केले आणि महाराष्ट्राची पहिली हेलिकॉप्टरचालक बनण्याचा मान २००६ मध्ये मिळविला. हवाई दल हे एक असे क्षेत्र आहे, की दलाच्या सेवेसाठी फायटर, मालवाहू व हेलिकॉप्टर असे तीन पर्याय असतात. परंतु पुरूषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात फ्लाइंगसाठी ११९४ पासून महिलांची भरती करण्यास सुरूवात झाली. या क्षेत्रात १९९४ ते २००५ या वर्षी राज्यातून एकाही महिलेची निवड झाली नाही. २००६ मध्ये हवाई दलाच्या क्षेत्रात देशभरातून विविध विभागातून केवळ १६ महिलांची निवड झाली. यापैकी महाराष्ट्रातून ही धाडसी कन्या हवाई दलात सहभागी झाली. २०१० मध्ये दिल्ली या ठिकाणी फ्लाइंग करीत असताना तिच्या हेलिकॉप्टरने अचानक पेट घेतला असताना ही तिने न घाबरता कोणतेही नुकसान न करता यशस्वीरीत्या हेलिकॉप्टर लँड केले, याबद्दल शासनातर्फे तिला चीफ आॅफ एअर कॉमन्डेंशन हे पदक मिळाले. तसेच २०११ मध्ये सिक्कीम येथील झालेल्या भूकंपात डोंगराळ भागातील सर्व रस्ते बंद असताना अन्न, पाणी व औषध पोहोचविण्याचे काम तिने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून केले.मध्यमवर्गीय परिस्थितीतून वाढलेल्या अरूणिमाची दहावी मराठी माध्यमातूनच पूर्ण झाली. पुढे वाडिया महाविद्यालयातून शिक्षण चालू असतानाच एनसीसीमध्ये सहभागी झाली. या मार्गाने दिल्ली परेडला निवड झाली व हाच क्षण तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉईट ठरला. सध्या ती स्कॉड्रन लिडर या पदावर असून चेतक व चिता हे हेलिकॉप्टर चालविते. नुकतेच तिने जंगल अ‍ॅन्ड स्नो सर्व्हायल ट्रेनिंग पूर्ण केले.मुले करिअर करू पाहत असेल तर पालकांनी मुलांना लोक काय म्हणतील याचा विचार न करता त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. कुटुंबाचा पाठिंबा हा सर्वात महत्त्वाचा असतो. - सुनंदा विधाते (अरूणिमा यांची आई)स्वत:वर विश्वास ठेवून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा व देशासाठी काहीतरी कामगिरी करून दाखवा. - अरूणिमा विधातेओबामांसमोर संचलनप्रजासत्ताकदिनाच्या दिवशी प्रमुख अतिथी असलेल्या ओबामा यांच्यासमोर राजपथावर नारीशक्ती दाखविताना हवाई दलाच्या ताफ्यातून अरूणिमाने संचलन केले. राजपथावर संचलन करण्याची तिची तिसरी वेळ होती.