Maharashtra Volleyball Team: महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपदी बारामतीची 'तेजस्विनी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 14:19 IST2022-04-12T14:17:01+5:302022-04-12T14:19:33+5:30

तेजस्विनी मलगुंडे हिने डिफेन्स, अटॅक,ब्लॉकिंग तसेच सर्व्हिस अशी सर्व बाजूने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती

maharashtra volleyball team new captain baramati student tejswini malgunde | Maharashtra Volleyball Team: महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपदी बारामतीची 'तेजस्विनी'

Maharashtra Volleyball Team: महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपदी बारामतीची 'तेजस्विनी'

बारामती : जयसिंगपूर, कोल्हापूर याठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पुणे विभागाच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. यामध्ये आपल्या बारामतीची खेळाडू तेजस्विनी मलगुंडे हिने डिफेन्स, अटॅक,ब्लॉकिंग तसेच सर्व्हिस अशी सर्व बाजूने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याचेच फलित म्हणून तिची महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली आहे. 

व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने रुद्रपुर उत्तराखंड येथे दि. ११ ते १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या.  युथ(२१ वर्षाखालील) राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठीच्या महाराष्ट्र मुलीच्या संघाची कर्णधार म्हणून जिल्हा क्रीडा संकुल बारामती व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू तेजस्विनी मंलगुडे हिची निवड करण्यात आली. तेजस्विनी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक शिवाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्पर्धेची तयारी जिल्हा क्रीडा संकुल येथील व्हॉलीबॉल मैदानावर करत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तहसीलदार विजय पाटील, तालुका क्रीडा अधिकारी बारामती महेश चावले, जिल्हा क्रीडा संकुल समिती पुणे,बारामतीचे सदस्य अविनाश लगड व बारामतीच्या क्रीडा क्षेत्रातील विविध खेळाचे मार्गदर्शक, खेळाडू यांनी तिचे अभिनंदन केले.

Web Title: maharashtra volleyball team new captain baramati student tejswini malgunde