शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : कोथरुडमधून चंद्रकांत पाटील तर कसब्यातून मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 00:27 IST

पुणे शहरातील भाजपाच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उतरविण्याच्या तयारी

पुणे : पुणे शहरातील भाजपाच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उतरविण्याच्या तयारी असून कसबा विधानसभा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे़ शिवाजीनगर मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात असतानाच तेथून नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याचे समजते.भाजपाच्या संसदीय समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सध्या नवी दिल्लीत सुरु आहे. तेथे महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे निश्चित करण्याचे काम सुरु आहे.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा लढवावी, अशी इच्छा भाजपाच्या नेत्यांची होती़ पण, कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असल्याने तेथे त्यांच्यासाठी कोणताही मतदारसंघ सुरक्षित वाटत नव्हता़ त्यामुळे कोथरुडमधून त्यांचे नाव निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.  कोथरुडमधून २०१४ मध्ये प्रा. मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध ६४ हजार मतांनी विजय मिळविला होता. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मतदारसंघात उमेदवारच नाही. आघाडीमध्ये त्यांनी हा मतदारसंघ मित्र पक्षांसाठी सोडला आहे. त्यामुळे अन्य मतदारसंघापेक्षा युतीसाठी कोथरुड सर्वात सुरक्षित समजला जाऊ लागला आहे.  त्यामुळेच तेथून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चितकेले जात आहे.  गिरीश बापट यांनी सातत्याने राखलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. कसबा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे़ गेली अडीच वर्षे मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पद सांभाळताना स्वच्छ प्रतिमा जपली आहे. बापट हे खासदार झाल्याने गेल्या २० वर्षांनंतर प्रथमच कसबा मध्ये तिकीटासाठी भाजपामध्येरस्सीखेच सुरु झाली होती.  हेमंत रासने, गणेश बीडकर, धीरज घाटे यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. पण सर्वसामान्यांना भावणारा चेहरा व महिला त्याचबरोबर गेल्या अडीच वर्षातील काम यामुळे मुक्ता टिळक यांचे पारडे जड ठरले. भाजपाच्या आठ ही विधानसभा मतदारसंघापैकी शिवाजीनगर मतदारसंघात अधिक तिढा होता. या जागेची मागणी शिवसेनेने केली होती. त्याचवेळी विद्यमान आमदार विजय काळे यांच्याविषयी पक्षांतर्गत विरोधही जाहीरपणे उफाळून आला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी गिरीश बापट यांना तिकीट देताना अनिल शिरोळे यांना तिकीट न देता विधानसभेला त्यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांना तिकीट देण्याचे ठरले असल्याची चर्चा होती. सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यादृष्टीने गेल्या काही महिन्यांपासून तयारीही सुरु केल्याचे मतदारसंघात दिसून येत होते.  दिल्लीच्या बैठकीत सिद्धार्थ शिरोळे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे़ २०१४ मध्ये या मतदारसंघात विजय काळे यांनी २२ हजार मतांनी विजय मिळविला होता.  लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी येथून मिळाली होती.  कोथरुड, कसबा आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात युतीचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना कोथरुडमधून सर्वाधिक ९७ हजार ४१० मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटीलयांचे नाव निश्चित केले गेले आहे.  कसबा विधानसभा मतदारसंघातून ५० हजार मतांनी आघाडी बापट यांनी घेतली होती तर शिवाजीनगरमध्ये २५ हजार मतांची आघाडी बापट यांना मिळाली होती. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019