इंदापूर येथे महाराष्ट्र राज्य कुस्ती निवड चाचणी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST2021-09-02T04:22:54+5:302021-09-02T04:22:54+5:30

उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते होणार असून, महाराष्ट्र राज्य ...

Maharashtra State Wrestling Selection Test Competition at Indapur | इंदापूर येथे महाराष्ट्र राज्य कुस्ती निवड चाचणी स्पर्धा

इंदापूर येथे महाराष्ट्र राज्य कुस्ती निवड चाचणी स्पर्धा

उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते होणार असून, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेने ठरवून दिलेल्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करूनच स्पर्धा पार पाडणार आहेत अशी माहिती देण्यात आली.

शनिवारी प्रथम टप्प्यात एकूण १० वजनगटांच्या फ्री स्टाईल प्रकारच्या मुलांची कुस्ती होणार आहेत, तर रविवारी मुलांची ग्रीकरोमन प्रकारातील कुस्ती, त्यानंतर मुलींची फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा होणार आहे. यातील प्रथम क्रमांकाने निवड झालेले कुस्ती मल्ल दि. १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान रोजी उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे, २३ वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील.

आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल पंचांचा चमू निवड प्रक्रिया पूर्ण करणार आहे. असे स्पर्धा संयोजक व मारकड कुस्ती केंद्राचे मार्गदर्शक मारुती मारकड यांनी माहिती दिली.

Web Title: Maharashtra State Wrestling Selection Test Competition at Indapur