MPSC Exam: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगामार्फत काैशल्य चाचणीच्या तारखा जाहीर
By प्रशांत बिडवे | Updated: June 6, 2024 19:27 IST2024-06-06T19:26:46+5:302024-06-06T19:27:32+5:30
जिल्हानिहाय गुणवत्ता यादीमध्ये १ हजार ४९८ उमेदवारांचा समावेश

MPSC Exam: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगामार्फत काैशल्य चाचणीच्या तारखा जाहीर
पुणे: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगामार्फत महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाकरिता टंकलेखन काैशल्य चाचणी दि. १ ते १३ जुलै या कालावधीत आयाेजित केली आहे. लोकसेवा आयाेगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी पत्रकाव्दारे ही माहिती देण्यात आली.
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या चाचणीचा दिनांक, ठिकाण तसेच उमेदवारांना दिलेली वेळ आदी तपशील त्यांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येणार आहे. प्रस्तावित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या http://www.mpsc.gov.in/ या संकेतस्थळावर Candidates Information >Instructions> General Instructions येथे 'Important Instructions to Candidates for Marathi and English Typing Skill Test' या सदराखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आयाेगाने दि. १५ एप्रिल राेजी कर सहायक पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली हाेती. जिल्हानिहाय गुणवत्ता यादीमध्ये १ हजार ४९८ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वाधिक ७८४ उमेदवार पुणे जिल्ह्यांतील आहेत.