महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 05:53 PM2022-01-25T17:53:00+5:302022-01-25T17:53:24+5:30

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट कामगिरीसाठीची पदके जाहीर

Maharashtra Police won 51 medals including 7 Bravery 4 Presidential Police Medals | महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके

महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके

googlenewsNext

पुणे : भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलाने ७ शौर्य पोलीस पदक, ४ विशिष्ठसेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक आणि ४० गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक पटकाविले आहे. तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील सात अधिका-यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. 

“...महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांची कामगिरी महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यानी या सर्व पदक विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीसाठी पाठबळ देणाऱ्या कुटुंबियांप्रतिही आदर व्यक्त केला आहे. 

अग्निशमन सेवेतील रक्षक बाळू देशमुख यांना शौर्यासाठी सर्वोच्च असा ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ मरणोत्तर जाहीर झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी कृतज्ज्ञता व्यक्त करून, दिवंगत देशमुख यांच्या स्मृतींना वंदन केले आहे. 

महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी गोपाळ उसेंडी, महेंद्र कुलेटी, संजय बकमवार, भारत नागरे, दिवाकर नरोटे, निलेश्वर पड, संतोष पोटावी यांना शौर्य पोलीस पदक तर अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, एसआरपीएफचे कमांडट प्रल्हाद खाडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, पोलीस उपनिरिक्षक अन्वरबेग मिर्झा यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलातील ४० अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. 

महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. याशिवाय उत्कृष्ट सेवेसाठी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्निशमक सुरेश पाटील, संजय म्हामूणकर, चंद्रकांत आनंददास यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Maharashtra Police won 51 medals including 7 Bravery 4 Presidential Police Medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.