शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांचे निलंबन, रोहित पवार म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:08 IST

पंचांनी चुकीचा निर्णय दिला हे स्पष्ट दिसत होतं. आमच्यावेळी स्पर्धेत गालबोट लागलं नाही, पारदर्शकपणा होता.

पुणे - ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादग्रस्त निर्णयावर अखेर कारवाई झाली असली, तरी यामागे मोठं राजकारण असल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अहमदनगरच्या वाडिया पार्क मैदानावर २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेतील गादी विभागाच्या अंतिम सामन्यात वादग्रस्त निर्णय घेण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.

पै. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पै. शिवराज राक्षे या कुस्तीत चितपट झाल्याचा निर्णय पंचांनी दिला. मात्र हा निर्णय अनेकांनी चुकीचा ठरवला. चौकशीनंतर मुख्य पंच नितिश कावलिया यांच्यावर तीन वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणाले,'दोन वर्षांपूर्वी संघटना सुरू झाली. पंचांनी चुकीचा निर्णय दिला हे स्पष्ट दिसत होतं. आमच्यावेळी स्पर्धेत गालबोट लागलं नाही, पारदर्शकपणा होता. आता घेतलेल्या निर्णयात मोठं राजकारण दिसत आहे. दबावाखाली चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. संघटनेत राजकारण वाढलं असून, आज झोपेतून जागे होऊन निर्णय झाल्यासारखं वाटतं.'

रोहित पवार यांनी  लाडकी बहीण योजनेवरही टीका केली यावेळी रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवरही टीका केली. योजनेचा आकडा आधीच कमी होणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. आता आकडा ८ लाखांवर गेला आहे. महिला फक्त निवडणुकीपुरत्या लक्षात घेतल्या जातात का, असा प्रश्न निर्माण होतो. दोन वेगवेगळ्या योजना असून, लाडकी बहीण योजनेतील महिलांचा मोठा आकडा लवकरच कमी केला जाणार आहे," असा इशाराही त्यांनी दिला. रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र केसरी व लाडकी बहीण योजना दोन्ही विषयांवर नव्याने चर्चा रंगण्याची शक्यता आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर सरकारवर, प्रशासनावर आणि काही नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. बीड, मंगेशकर हॉस्पिटल, गुलाबराव पाटील यांच्यापासून ते अजित पवारांच्या भूमिकेवर त्यांनी रोखठोक भाष्य केलं. बीड ही पवित्र भूमी आहे, पण काही नेत्यांमुळे बीडचे नाव बदनाम झाले आहे. कराड यांना शिक्षा झाली पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. या प्रकरणात पोलिस खात्यातील आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास व्हावा,” अशी मागणी त्यांनी केली.

मंगेशकर हॉस्पिटलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंगेशकर हॉस्पिटलसंदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले, “समित्यांमधून काही निष्पन्न होत नाही. जो दोषी आहे. डॉक्टर असो की संस्था, त्यावर कारवाई झाली पाहिजे. सगळ्या खासगी रुग्णालयांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सरकार अहंकारी आहे. लोक आता स्वतःच्या हक्कासाठी उभे राहत आहेत.

यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांना टोला लगावला. गुलाबराव पाटील यांच्या 'सोन्याचा चमचा' वक्तव्यावर टीका करत रोहित पवार म्हणाले,“मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो असं कोणी म्हणालं, तरी त्याचा उपयोग नाही. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, काही तरी ठोस काम करा. शिक्षणात निर्णय घ्या, CBSE स्वीकारा, काहीतरी वेगळं करून दाखवा. एकनाथ शिंदे मोठे नेते आहेत, मग त्यांच्या मुलाने सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतला असं म्हणायचं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवारांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरणमाध्यमांनी अजित पवार यांची भूमिका बदलल्याचं भासवलं, त्यावर रोहित पवार म्हणाले, “मी अजितदादांचं भाषण ऐकलं नाही. त्यांनी काय बोललं माहित नाही. कुटुंबात काही निर्णय घेतले जातात, तसाच हा एखादा कौटुंबिक निर्णय असावा. मलाही कधी कधी काकांचा, आजोबांचा आशीर्वाद घ्यावा लागतो.”

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRohit Pawarरोहित पवारMahayutiमहायुतीMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा