शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रीय शेतकऱ्यांना हवेत हेक्टरी ५० हजार रुपये; 'आप'ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:56 IST

पुण्यातील ५५ महसूल मंडले तसेच सोलापूर, बीड, भंडारा, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे

पुणे : पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले. पंजाबमध्ये झालेल्या अतिवृष्टीत तेथील भगवंत मान सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत म्हणून दिले. आता राज्यातील युती सरकारनेही पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत म्हणून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली.

पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, पुण्यातील ५५ महसूल मंडले तसेच सोलापूर, बीड, भंडारा, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. अनेकांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले. सोयाबीन पाण्याखाली. कापूस पीक अडचणीत आहे. संत्रा, मोसंबी अशा फळबागांमध्ये गळती होऊन त्यांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देणे गरजेचे असतानाही राज्य सरकारकडून त्यावर काहीच हालचाल व्हायला तयार नाही. याच सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, आता ते हवेतच विरले आहे. दुसरीकडे अशाच पूरस्थितीमध्ये पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या भगवंत मान सरकारने शेतकऱ्यांना तब्बल ५० हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई जाहीर केलेली आहे. ही मागणी विरोधी पक्षात असताना अनेकजण करतात, परंतु सत्तेवर आल्यावर याची अंमलबजावणी करणारे आपचे सरकार देशातील पहिले सरकार आहे, असा दावा किर्दत यांनी केला.

कर्जमाफीबाबत तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना फसवले आहेच, पण फक्त २ हेक्टर जमिनीवरच्या नुकसान झालेल्या पिकासाठीच मदत मिळेल असा निर्णय घेत त्यांनी आधीच पिडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. ही मदतही कोरडवाहूसाठी ८ हजार ५०० व बागायतीसाठी १८ हजार इतकीच आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत अत्यल्प आहे. त्यात अमेरिकेतून कापूस आयात करण्यासारखे निर्णय सरकार घेत आहे. आता किमान मदतीबाबत तरी सरकारने हात आखडता घेऊ नये. आपचे कार्यकर्ते राज्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून या मागणीचे निवेदन देणार आहेत, अशी माहिती किर्दत यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीAam Admi partyआम आदमी पार्टीMONEYपैसाRainपाऊसweatherहवामान अंदाज