शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 :'चंपा' शब्द माझा नाही तर भाजपच्या मंत्र्याचा ; नाव निवडणुकीनंतर सांगेन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 11:11 IST

भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मी वापरलेला 'चंपा' हा शब्द माझा नसून भाजपच्याच एका कॅबिनेट मंत्र्यांचा आहे असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. 

पुणे : भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मी वापरलेला 'चंपा' हा शब्द माझा नसून भाजपच्याच एका कॅबिनेट मंत्र्यांचा आहे असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. 

पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, 'चंपा' हा शब्द माझा नाही. मी एका भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याकडे गेलो होतो. त्यांनी त्यावेळी बोलताना चंपा माझं ऐकतील असं वाटतं नाही असं वाक्य वापरलं.त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे ही मी चंद्रकांतदादांना भेटून सांगेन. मात्र आम्ही नाही तर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे मंत्री असं म्हणतात, हा आमचा शब्द नाही. 

अजित पवार यांनी पिंपरी येथील सभेत चंपा शब्द वापरल्यावर राज ठाकरे यांनीही पुण्यात वापरला होता. त्यावरून पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या सभेत प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे हा वाद वाढलेला दिसून आला. आता मात्र पवार यांनी काहीशी मवाळ भूमिका घेत भाजपच्याच मंत्र्याकडे बोट दाखवले आहे. 

यावेळी पवार यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • भाजपने कितीही आव आणला तरी नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजप आहे, नितीन गडकरीही फारसे प्रचारात दिसले नाहीत. 
  • मी निवनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजीनामा दिला नाही, मी नौटंकी करणारा नेता नाही, वेळ बघून काहीही करत नाही. 
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा अभिमान 
  • अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु असल्यामुळे प्रचारावर परिणाम 
  • तिकीट वाटपात उशीर झाल्याने काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्रित सभा होऊ शकली नाही. 
  • पंतप्रधान प्रचारासाठी आल्यामुळे आम्हाला आमच्या सभा रद्द कराव्या लागल्या, हेलिकॉप्टर उडू दिले नाही. 
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019