शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पर्वतीमधील मतदानाचा टक्का स्थिर : मध्यमवर्गीयांमध्ये उत्साह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 07:00 IST

Parvati Election 2019: एक-दोन ठिकाणी मतदान केंद्र बदलल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता...

ठळक मुद्देझोपडपट्टी बहुल भागात उत्साह तुलनेने कमी, निवडणूक आयोगाकडून चोख व्यवस्थावस्त्या, चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील मधील मतदार दुपारनंतर बाहेर पडले.

पुणे : दक्षिण पुण्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पर्वती मतदार संघामध्ये उत्साहात मतदान पार पडले. विशेषत: मध्यमवर्गीय मतदारांकडून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. तर, वस्त्या, चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील मधील मतदार दुपारनंतर बाहेर पडले. पावसाने उघडीप दिल्याने मतदार सकाळपासूनच बाहेर पडायला सुरुवात झाली होती. निवडणूक आयोगाने ६४ केंद्रांवरील ३४४ खोल्यांवर चोख व्यवस्था ठेवली होती. २०१४ साली पर्वतीमध्ये ५५ टक्के मतदान झाले होते. यंदाही हा टक्का स्थिर राहण्याची शक्यता आहे.  सकाळी सात वाजल्यापासूनच सोसायटी भागांमधील नागरिकांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर गर्दी करायला सुरुवात केली होती. दुपारी काही प्रमाणात ओसरलेली गर्दी संध्याकाळी पुन्हा वाढली. झोपडपट्ट्या, सोसायट्या, चाळी, उपनगरांचा समावेश हा मतदार संघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. मध्यमवर्गीय मतदारांची महत्वाची ‘पॉकेट्स’ मतदार संघात आहेत. या पॉकेट्सवर लक्ष केंद्रित करीत प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने सुरुवात काहीशी मगरळलेली झाली होती. परंतू, नऊनंतर ऊन पडू लाग्ल्याने मतदार बाहेर पडले. सकाळपासूनच बिबवेवाडी, सहकारनगर, अरण्येश्वर, पर्वती, सिंहगड रस्ता, सॅलिसबरी पार्क, मुकुंदनगर, गुलटेकडी, महर्षीनगर, सातारा रस्ता परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांमार्फत मतदार सहाय्य कक्ष उभारले होते. टेबल टाकून त्यावर मतदार याद्या घेऊन बसलेले कार्यकर्ते जागोजाग दिसत होते. अनेक मतदार याद्या तपासून स्लिपा घेऊन जात होते. विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांवर मतदार पोचत होते. ज्येष्ठ नागरिक, महिलांसह तरुणांचा उत्साह दिसत होता. काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नावच न आल्याने काही मतदारांना परत जावे लागले. तर एक-दोन ठिकाणी मतदान केंद्र बदलल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता. मतदान केंद्रांवर सकाळी दिसत असलेली गर्दी दुपारी कमी झाली होती. मात्र, संध्याकाळी पुन्हा मतदार उत्साहाने बाहेर पडल्याचे पहायला मिळाले. बिबवेवाडीतील सिताराम आबाजी बिबवे शाळा, इंदिरानगर, महर्षीनगर येथील संत ज्ञानदेव व संत नामदेश शाळा, कटारीया हायस्कूल, सहकारनगरचे शिंदे हायस्कूल, अध्यापक महाविद्यालय, संदेशनगरमधील पालिका शाळेमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. ====निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा पुरविण्यात आल्या. पाण्याची व्यवस्था आणि जलद गतीने मतदान कसे होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. यासोबतच दिव्यांग मतदारांसाठी तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता सर्व मतदार केंद्रांवर व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात आली होती. ==== पर्वती मतदार संघातील शकुंतला शिंदे संकुल, बॅडमिंटन हॉल, बिबवेवाडी येथील मतदान केंद्रावर अभियंता अमोल देशपांडे यांच्या नावाने बोगस मतदान झाले. देशपांडे सकाळी सव्वाआठच्या सुमारास मतदानाला गेले असता त्यांच्या नावावर साडेसातच्या सुमारास आधीच मतदान झाल्याचे निदर्शनास आले. लोकसभा निवडणुकीतही देशपांडे यांना असाच अनुभव आला होता. हा प्रकार देशपांडे यांनी केंद्राध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांचे टेंडर (प्रदत्त) मतदान घेण्यात आले.====सहकारनगर येथील अध्यापक महाविद्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी मतदानाकरिता आलेले सहा ते सात ज्येष्ठ नागरिक रस्त्यावरील शेवाळामुळे घसरुन पडले. त्यातील एका ज्येष्ठाच्या डोक्याला जबर दुखापत झाली. बंदोबस्तावर असलेले पोलीस हवालदार प्रविण जगताप आणि पीडब्ल्यूडीचे प्रवीण देवरुखकर यांनी या ज्येष्ठाला रिक्षामध्ये बसवून घरी पाठवून दिले. त्यानंतर अशी दुर्घटना होऊ नये म्हणून रस्त्यावर ग्रीन कार्पेट टाकण्यात आले  होते. =====2014 विधानसभा निवडणूकएकूण मतदार        : 3, 40, 050एकूण मतदान        : 1, 89, 767टक्केवारी        : 55%.............2019 लोकसभा निवडणूकएकूण मतदान        : 1, 83, 470टक्केवारी        : 52.07

टॅग्स :Puneपुणेparvati-acपर्वतीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान