शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : हडपसरमध्ये शरद पवार यांचा विचार उभा : डॉ. अमोल कोल्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 14:10 IST

Maharashtra Election 2019 : आलिशान, महागड्या गाडीची हौस असणे चांगले आहे, पण ती स्वकष्टार्जित असावी. कोणाच्या मेहेरबानीने लाभलेली नसावी.

ठळक मुद्दे सुसंस्कृत उमेदवार निवडून द्यावा..

हडपसर : हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे-पाटलांच्या रूपाने फक्त उमेदवार उभा नाही, तर शरद पवार यांचा विचार उभा आहे, त्यांच्या विचाराला महाराष्ट्र साद देत असताना हडपसरने मागे राहू नये. येत्या २१ ऑक्टोबर रोजी चेतन तुपेना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या केशवनगर व नंतर कात्रज येथील सभेत डॉ. कोल्हे यांनी  जनतेशी संवाद साधला. डॉ. कोल्हे  म्हणाले,  आलिशान, महागड्या गाडीची हौस असणे चांगले आहे, पण ती स्वकष्टार्जित असावी. कोणाच्या मेहेरबानीने लाभलेली नसावी. हडपसर विधानसभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चेतन तुपे पाटलांच्या रूपाने सुसंस्कृत व सुशिक्षित चेहरा उमेदवार म्हणून दिला आहे. आबालवृद्धांना, माता-भगिनी, युवांना आपले वाटणारे हे नेतृत्व आहे. हडपसरचा खुंटलेला विकास सामान्यांचा विचार करणारा चेतन तुपे यांच्यासारखा उमदा नेताच करू शकतो.  डॉ. कोल्हे म्हणाले, की  भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आमदारांना त्यांची योग्य जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. हडपसरच्या विकासात असलेली बाधा दूर करण्यासाठी आता निकराची लढाई करावी लागणार आहे. हडपसरचा, इथल्या माणसांचा विचार करणारा आमदार जनतेला निवडून द्यावा लागेल. त्यातूनच हडपसरचा खुंटलेला विकास पुन्हा मार्गी लागेल. ......हडपसरचा आमदार मूठभर बिल्डरांच्या हातातला ‘बाहुला’ नसावा, तर चेतन तुपे पाटलांसारखा जनतेचा विचार करून विकासाभिमुख कामे करणारा असावा. आता जनतेने आपला माणूस विधानसभेला पाठवावा, असे आवाहनही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

टॅग्स :Puneपुणेhadapsar-acहडपसरChetan Tupeचेतन तुपेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस