Maharashtra Election 2019: Scindia's plane was deliberately blocked | Maharashtra Election 2019: जाणीवपूर्वक सिंधिया यांचे विमान अडवून ठेवले; माजी आमदार मोहन जोशींचा आरोप

Maharashtra Election 2019: जाणीवपूर्वक सिंधिया यांचे विमान अडवून ठेवले; माजी आमदार मोहन जोशींचा आरोप

पुणे : माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे विमान गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान येणार होते. मात्र त्याचवेळी नरेंद्र मोदी पुण्यात असल्याने एटीसी (एअर ट्रॅफिक कंटोल) यांनी सिंधिया यांना पुण्याकडे येताना रोखले, असा आरोप माजी आमदार मोहन जोशी यांनी केला. गुरुवारी वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात सिंधिया यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या सभेला सिंधिया अनुपस्थित राहिले. याविषयीचे कारण स्पष्ट करताना जोशी यांनी भाजपवर टीका केली.

ते म्हणाले, आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सिंधिया यांना आणण्यासाठी विमानतळावर गेलो होतो. सोलापूर येथील सभा घेऊन ते सायंकाळी साडेसहा वाजता वानवडी येथे येणार होते. परंतु त्याचवेळी सिंधिया यांना सोलापूरवरून उड्डाण करण्यास एटीसीने मज्जाव केल्याचे समजले. याचे मुख्य कारण सिंधिया यांनी एटीएसला विचारले असता त्यांनी "पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. त्या सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला त्याठिकाणी जाता येणार नाही," असे सिंधिया यांना सांगितले. 

एकीकडे एटीसीने सुरक्षाचे कारण देत असली तरी त्यावेळी पुणे विमानतळावर वेगवेगळ्या खासगी कंपनीच्या विमानचे उड्डाण सुरू होते. विशेष म्हणजे गुरुवारी सायंकाळी खासदार रामदास आठवले यांच्या विमानाने  लोहगाव विमानतळावरून टेक ऑफ केले. मात्र त्यांच्या विमानाला एटीएसने कुठली हरकत घेतली नाही. एका बाजूला मोदींची सभा सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या मित्र पक्षातील मंत्री विमानाने प्रवास करतात हे चालते. परंतु विरोधी पक्षांतील नेत्यांच्या विमान प्रवासाला जाणीवपूर्वक विरोध केला जातो.

भाजपने जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. मोदी यांची सभा पुण्यात आयोजित केल्यापासून टिळक रस्ता, शास्त्री रस्ता दुपारी बारा पासून सायंकाळी उशिरापर्यंत रस्ते बंद करण्यात आले होते. या सगळ्यात सत्ताधारी पक्षाची हुकूमशाही दिसून आल्याची टीका जोशी यांनी केली. फुले सभागृहातच्या आवारात पार पडलेल्या सभेला पुणे कँटोमेन्ट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नूतन शिवरकर, माजी खासदार रजनी पाटील, शिवाजी केदारी, सचिन तावरे, विनोद मथुरावाला, संगीता तिवारी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election 2019: Scindia's plane was deliberately blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.