शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हा प्रचाराचा धागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 12:32 IST

Maharashtra Election 2019 : केंद्र व राज्य सरकारच्या कामामुळे यश मिळेलच..

भूमिका - पर्वती मतदारसंघ  

- माधुरी मिसाळ

शहरातील आठही मतदारसंघांमध्ये पुन्हा भाजपचे सर्व आमदार निवडून येतील. शहरामध्ये प्रचाराची चोख यंत्रणा राबविण्यात आली असून शिवसेना, आरपीआयसह मित्रपक्षांसोबत उत्तम समन्वय ठेवण्यात आला आहे. शहराच्या भाजपच्या कोअर कमिटीमध्ये मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि केलेल्या कामांची माहिती देणे हाच प्रचाराचा मुख्य धागा असल्याचे शहराध्यक्षा आणि पर्वतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी सांगितले.मिसाळ यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. मिसाळ म्हणाल्या, की निवडणुकीच्या काही दिवस आधी शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. आठही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची रचना पक्षाच्यावतीने लावण्यात आलेली आहे. पक्षाच्या या रचनेमुळे काम अधिक सोपे झाले आहे. इतर मतदारसंघांमध्ये शहराध्यक्ष म्हणून फिरावे लागले. परंतु, त्यासाठी फार वेळ द्यावा लागला नाही. पक्षाच्या कोअर कमिटीची दररोज रात्री बैठक असते. या बैठकीमध्ये मतदारसंघनिहाय कामकाजाचा आणि प्रचार यंत्रणेचा आढावा घेतला जातो. या बैठकीला मित्रपक्षांचे पदाधिकारीही उपस्थित असतात. बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार दुसºया दिवशीची तयारी केली जाते. त्यानुसार, प्रचाराचे नियोजन केले जाते. या दररोजच्या समन्वय बैठकीचा मोठा उपयोग झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सभेमुळे भाजपचे मताधिक्य वाढण्यास मदत मिळेल. मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम, प्रदेश व शहरस्तरावरील कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल, अशी आशा मिसाळ यांनी व्यक्त केली. प्रदेश कार्यकारिणीकडून गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमधील नेत्यांचे दौरे आयोजिण्यात आले होते. या नेत्यांची ज्या मतदारसंघात आवश्यकता होती; त्यानुसार नियोजन करण्यात आले होते. याचाही मोठा उपयोग प्रचारादरम्यान झाल्याचे मिसाळ यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे महापालिकेमध्ये ९८ नगरसेवक आहेत. तसेच एक खासदार आणि आठ आमदार आहेत. या सर्व लोकप्रतिनिधींच्या जनसंपर्काचा आणि कामाचा निश्चितच फायदा होतो आहे. शहर पातळीवर काम करणारे पदाधिकारी, स्थानिक पातळीवरील नगरसेवकांचे आणि पदाधिकाऱ्यांचे काम महत्वाचे ठरले. पक्षाचे मुद्दे घेऊन जाताना नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले आहे. नगरसेवकांमुळे तर प्रचार यंत्रणा अधिक सक्षम झाली. बूथस्तरापासून पोलिंग एजंटपर्यंत त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. शिवसेनेसोबत भाजपच्या उत्तम समन्वय आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग आम्हाला लाभला. प्रचार यंत्रणेमध्ये सर्व शिवसैनिक सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Puneपुणेparvati-acपर्वतीMadhuri Misalमाधुरी मिसाळBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019