शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Maharashtra Election 2019 : ‘पर्वती’ सर करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 14:23 IST

भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्यामध्ये  ‘महिलेविरुद्ध महिला’ अशी लढत होत असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देप्रचाराचा धुरळा : असंघटित कामगार, अल्पसंख्याक आणि व्यापारी वर्गावर विशेष लक्षनगरसेवकांची संख्या ठरणार महत्त्वाचा मुद्दा

पुणे : विधानसभा निवडणुकांचा प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून, पर्वती मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून असंघटित कामगार, अल्पसंख्याक आणि व्यापारी वर्गावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्यामध्ये  ‘महिलेविरुद्ध महिला’ अशी लढत होत असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पर्वती मतदारसंघाची व्याप्ती मोठी आहे. बिबवेवाडीपासून स्वारगेटपर्यंत आणि स्वारगेटपासून थेट हिंगणे-सिंहगड रस्त्यापर्यंत पसरलेल्या मतदार संघात मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांमधून आणि परराज्यातून स्थलांतरित झालेले नागरिक मोठ्या प्रमाणावर राहतात. दोन्ही पक्षांकडून आपापल्यापरीने या समाज समूहांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या उमेदवार मिसाळ यांच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर, मतदारसंघात पंकजा मुंडे यांची सभा घेण्यात आली. यासोबतच शहर पातळीवरील नेते-पदाधिकारी प्रचारात सक्रिय आहेत. तर, राष्ट्रवादीकडून कदम यांच्या प्रचारासाठी अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या रोड शोचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच खासदार सुप्रिया सुळे यांनी असंघटित कामगारांचा मेळावा घेतला. डॉ. वंदना चव्हाण, मोहन जोशी, अ‍ॅड. अभय छाजेड आदी नेते प्रचारात उतरले आहेत. तर, काही प्रमुख पक्षनेते प्रचारापासून अलिप्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक पदाधिकाºयांना सक्रिय करण्याचे आव्हान अद्याप कायम आहे. .....................पर्वती मतदारसंघात एकूण २५ नगरसेवक आहेत. यातील तब्बल २४ नगरसेवक भाजपचे असून, त्यामध्ये दोन स्वीकृत नगरसेवकांचा समावेश आहे. त्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची ताकद कमी आहे. राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा अवघा एक नगरसेवक या मतदारसंघात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रचार करताना आणि निवडणूक यंत्रणा राबवित असताना नगरसेवकांच्या संख्येचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.व्यापारी वर्गाला गळ पर्वतीमध्ये सर्वाधिक व्यापारी राहतात, तसेच व्यवसाय करतात. या व्यापारी व उद्योजकांना चुचकारण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुकुंद नगर येथील सभागृहात व्यापारी वर्गाची बैठक घेतली. जीएसटी, नोटाबंदी आदी मुद्द्यांवरुन व्यापारी वर्गाला आपल्याकडे खेचण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे, तर भाजपनेही या व्यापारी वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील नेत्यांची मदत घेतली आहे. या राज्यांमधील नेते मतदारसंघात येऊन आपापल्या भागातील लोकांशी संवाद साधत आहेत.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPoliticsराजकारणMadhuri Misalमाधुरी मिसाळBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस