Maharashtra election 2019: शक्तीप्रदर्शनासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमधून अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 12:19 IST2019-10-03T12:17:08+5:302019-10-03T12:19:45+5:30
कोथरूड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅली..

Maharashtra election 2019: शक्तीप्रदर्शनासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमधून अर्ज दाखल
पुणे :कोथरूडमधून महायुतीचे उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला.
कोथरूड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला होणार सुरुवात झाली. तिथून शक्तीप्रदर्शन करत पाटील यांनी कर्वे भरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले.
त्यापूर्वी त्यांनी कोथरूडचे ग्रामदैवता म्हातोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शिवाजी महाराजांचा पुतळा येथे जमून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी खासदार गिरीश बापट, संजय काकडे, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते.
मी पुण्याचा जावई आहे. पुण्याचे अनेक प्रश्न मी सोडविले. मुंबई बरोबर पुणे वाढत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर, चंद्रकांत मोकाटे यांची समजूत घालताना, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत. तुम्ही मला सहकार्य करा, असे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर मोकाटे पाटील यांनीही रॅलीत सहभागी झाले होते.